शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 18:42 IST

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत.

पनवेल : मागील 9 वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याठिकाणी समाजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या शेकडो समजदूतांनी आपल्या समावेशनासाठी पुणे ते मुंबई (मंत्रालय ) असा लाँच  मार्च दि.9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त सुरु केला आहे. दि.15 रोजी शेकडो समाजदुतांचा लाँच मार्च पनवेलमध्ये दाखल झाला होता.

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत. महागाई गगनाला भिडत असताना मागील 9 वर्षात एकही रुपयाची पगारवाढ या समजदूतांना मिळाली नाही.शासनाने मागविलेल्या अहवालात या समजदूतांचे कायमस्वरूपी सामावेश करण्यास हरकत नसल्याचा अहवाल सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाला आहे मात्र तरी देखील काहीच निर्णय होत नसल्याने संतप्त समजदूतांनी पुणे येथून लाँच मार्चला सुरुवात केली आहे. सहा दिवस उलटले तरी अद्याप शासनाच्या प्रतिनिधींनी या समजदूतांची भेट घेतलेली नाही.

या लाँच मार्चमध्ये जवळपास 175 समाजदूत सहभागी झाले आहेत.सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची देखील या समजदूतांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. मात्र केवळ आश्वासनावर समजदूतांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी आम्ही आझाद मैदानात देखील धरणे दिले होते, मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही. याकरिताच शेवटचा पर्याय म्हणून आम्ही लॉंग मार्च काढून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असल्याचे समजदूतांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.

साडेबारा हजारात कसे जगायचे?समाजदूत म्हणून अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामध्येच आमचा निम्मा पगार खर्ची होतो. त्यामुळे साडेबारा हजारात कसे जगायचे, हे तुम्हीच सांगा साहेब? असा प्रश्न हे समाजदूत उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई