शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

शहरात कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 23, 2015 01:12 IST

उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला.

नवी मुंबई : उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शहरातील बऱ्याच ठिकाणी रावणाचे दहन करण्यात आलेदसऱ्याच्या स्वागतासाठी महिलांची पहाटेपासूनच लगबग सुरू होती. त्यांनी दारी रांगोळ्या काढल्या. बच्चे कंपनीने आपली सायकल, बाबांची गाडी धुऊन काढत वाहनांची पूजा केली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावर काहींनी घरी नवी वाहने आणली, तर अनेकांनी गृहप्रवेश केला. सोन्याचा दिवस म्हणून ओळख असणाऱ्या या दिवशी अनेकांनी सोने-चांदीच्या खरेदीचा शुभ मुहूर्त गाठला. नवरात्रोत्सवाची सांगता आणि विजयादशमीचा आनंद साजरा करण्यासाठी गृहिणींनी गोडा-धोडाच्या स्वयंपाकाचा बेत आखला होता. अनेकांच्या घरांमधून पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड अशा गोड पदार्थांसह सुग्रास भोजनाच्या पंक्ती उठल्या. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही शुभेच्छांचा वर्षावयंदा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या सोशल नेटवर्किंग साईट्सवर संदेश खरोखरच सामाजिक क्रांती घडविणारे तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल उचलायला लावणारे होते. एक पान तोडण्यापेक्षा एक एक झाड लावू यात, आपट्याची पाने तोडून वाटण्यापेक्षा आपट्याची रोपे वाटू यात, आपट्याची पाने देण्यापेक्षा फक्त हात जोडून म्हणा शुभ दसरा, सोन्यासाठी आपट्याचा हट्ट का हवा असे संदेश एकमेकांना फॉरवर्ड करत तरुणाईने पर्यावरणपूरक दसरा साजरा केला.मिठाई खरेदीसाठी रांगासणासुदीच्या दिवसात मिठाई भेट देऊन मित्रपरिवार, नातेवाइकांमधील नातेसंबंध आणखी चांगले जपता येतात. यासाठी सकाळपासून शहरातील मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांभोवती भल्या मोठ्या रांगा पहायला मिळाल्या.