शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विकासकाकडून शेकडो ग्राहकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 23:45 IST

वेगवेगळ्या गृहप्रकल्पात ८०० हून अधिक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

नवी मुंबई : वेगवेगळ्या गृहप्रकल्पात ८०० हून अधिक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. नवी मुंबईसह पुणे परिसरात गृहप्रकल्प सुरू असल्याचे सांगून ग्राहकांकडून लाखो रुपये घेवून त्यांना घरांचा ताबा न देता फसवणूक झाली आहे. त्यामध्ये एकाच विकासकाचा सहभाग असल्याची बाब किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणली आहे.अमरीत, अमृत, निसर्ग बाग अशा विविध नावाच्या गृहप्रकल्पात फसवणूक झालेली आहे. त्यामध्ये फसवणूक झालेले ८०० हून अधिक ग्राहक समोर आले असून तो आकडा अधिक वाढण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी वर्तवली आहे. त्यानुसार संबंधित विकासकाला तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गृहप्रकल्पाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी आपल्याला संपर्क साधल्यानंतर आपण संबंधित विकासकाची माहिती काढली असता, त्यामागे सचिन झेंडे नावाची व्यक्ती सूत्रधार असल्याचे समोर आल्याचेही त्यांनी ऐरोली येथे सांगितले. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेतली होती. त्यानंतर यासंबंधीचा तपास गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. त्यानंतर रविवारी फसवणूक झालेल्या ग्राहकांसाठी ऐरोलीत बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनीही उपस्थित राहून लवकरच संबंधितांना अटक केली जाईल असे आश्वासन दिले. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आलेला आहे. चौकशीत इतरही अनेक बाबी समोर येण्याची शक्यताही ग्राहकांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग याप्रकरणी अधिक तपास करत आहे.>फसवणूक झालेले ८०० हून अधिक ग्राहक समोर आले असून आकडा वाढण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी वर्तवली आहे. विकासकाला अटक करण्याची मागणी केली आहे.