शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 02:38 IST

विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला आहे.

नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला आहे. मुंबई विभागातील ५१८ केंद्रावर ३ लाख २० हजार ७७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे तर ठाणे जिल्ह्यातील १३६ केंद्रावर २६ हजार २१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सहा भरारी पथके व दक्षता समिती नेमण्यात आली असून यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण यांचे पाचवे पथक तर सहावे महिलांच्या पथकाचा समावेश आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. परीक्षेच्या अर्ध्या तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही याठिकाणी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या मदतीला यंदाही बोर्डाची हेल्पलाइन उपयोगी ठरली आहे. मुंबई विभागातल्या १५० विद्यार्थ्यांनी ऐनवेळी या हेल्पलाइनचा वापर केला असून परीक्षेच्या सेंटर बरोबरच, मनातील परीक्षेविषयीची भीती, तणाव यावरही विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले.२परीक्षेच्या सुरवातीला अगदी एक दिवसावर येऊन ठेपलेल्या वेळी निराशा तसेच अभ्यासाबाबत तक्रारींविषयीच्या समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. लक्षात राहत नाही, घाबरगुंडी उडाली आहे, पोटात गोळा आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर अशा चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांनी समुपदेशकही हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच त्रस्त असून पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी खात्री करण्यासाठी पालकांनीही या हेल्पलाइनचा आधार घेतला आहे. ३मुंबई विभागातील समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी परीक्षेला जाण्याअगोदर काहीच तासापूर्वी देखील ३० विद्यार्थ्यांनी या हेल्पलाइनच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा केंद्र आणि ठिकाणाची खात्री करुन घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांकडून पुरेपूर खात्री करून घेतली जाते. > पनवेल तालुक्यात एकूण ९,४५७ परीक्षार्थीच्पनवेल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारी सुरुवात झाली. पनवेल तालुक्यात एकूण ८ परीक्षा कें द्रावर ही परीक्षा होणार आहे. तालुक्यातील एकूण ९,४५७ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. २८ मार्चपर्यंत चालणाऱ्या परीक्षेचे शिक्षण विभागाने नियोजन केले असून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या आतमध्ये बुुट घालण्यास बंदी घातली आहे. च्कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात एकूण ५ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विविध परीक्षा केंद्रावर भेट देवून भरारी पथक कॉपी बहाद्दरांना आळा घालणार आहेत. खारघरमध्ये यावेळी प्रथमच सीजीएम शाळेत नवीन केंद्र सुरु करण्यात आले आहे.