शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:39 IST

नवी मुंबई : बडोदा बँक लुटल्याची घटना गंभीर असून, लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे याचे आश्चर्य सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : बडोदा बँक लुटल्याची घटना गंभीर असून, लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे याचे आश्चर्य सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केले आहे. लॉकर फोडण्याच्या घटना तुरळक असून, पोलीस अत्यंत वेगाने तपास करत असल्याचेही ते म्हणाले. वर्षभरात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधील जप्तीचा ऐवज संबंधितांना वाटप करण्याच्या कार्यक्रमास ते वाशी येथे उपस्थित होते.घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागत असते. अशावेळी तपासकौशल्य व तांत्रिक बाबींचा वापर करून गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांची कसोटी लागलेली असते. या सर्व आव्हानांवर मात करत वर्षभरात उघड केलेल्या ८७ गुन्ह्यांमध्ये १ कोटी ९३ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये २००७ पासून ते २०१७ दरम्यान घडलेल्या घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूट अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे शाखा, परिमंडळ एक व दोन या पोलिसांंनी उघडकीस आणलेले हे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांची तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांकडून संबंधितांना त्यांचा ऐवज परत करण्यात आला. याकरिता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी गत आठवड्यात घडलेल्या बडोदा बँक लुटीच्या घटनेचे गांभीर्य व्यक्त केले. लॉकर लुटण्याच्या घटना कमी आहेत, मात्र गुन्हेगार लॉकरपर्यंत पोचलेच कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.नवी मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याची परंपरा जोपासली असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी ऐरोली येथील बँकेवर दरोडा टाकणाºयांसोबत झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या बाबासाहेब आढाव यांच्या स्मृतींना देखील त्यांनी उजाळा दिला. राज्यातच लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने, गुणवत्तापूर्ण काम दाखवण्याचे अवघड होत आहे. त्यानंतरही चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून तो संबंधितांना परत करण्यातच पोलिसांचे सुख असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त प्रवीण पवार, तुषार दोषी, नितीन पवार, राजेंद्र माने यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी चोरीचा ऐवज परत मिळेल याची आशा नसतानाही, पोलिसांनी तो मिळवून दिल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला.>नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याची परंपरा जपलेली आहे. यामुळे उच्च स्तरावर त्यांची प्रतिमा उजळ झालेली आहे. याच गोपनीय अहवालानुसार राज्यात प्रथमच ‘लोकमत’ने एप्रिल महिन्यात नवी मुंबई पोलीस दलातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानित केले होते. या कार्यक्रमाचा देखील उल्लेख निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी आवर्जून केला.घडलेल्या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तक्रारदाराला त्यांचा मुद्देमाल परत करताना पोलीस अधिकारी.