शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा अंत्यविधी सुरू असताना घराला आग; कुटुंबावरील दुहेरी संकटानं परिसरात हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:47 IST

एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांचे घर जळाल्याचा प्रकार तुर्भे हनुमाननगर परिसरात घडला.

नवी मुंबई : एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांचे घर जळाल्याचा प्रकार तुर्भे हनुमाननगर परिसरात घडला. अरुण लाडके यांच्यावर एकाच वेळी ओढावलेल्या दोन संकटांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.हनुमाननगर येथे राहणाऱ्या अरुण लाडके यांचा मुलगा शिवम (२३) याचा शनिवारी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. शिवम हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनामुळे लाडके कुटुंब दु:खात होते. त्यानुसार शनिवारी दुपारी हनुमाननगर येथील स्मशानभूमीत शिवम याच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. त्याच वेळी दुसरीकडे लाडके यांच्या घरालाही आग लागली.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख तय्यब पटेल, भाजप प्रदेश सचिव सुरेश गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी महावितरणला कळवून तत्काळ परिसराचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर पाण्याचा मारा करून घरामध्ये लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते....तर परिसराला धोका निर्माण झाला असताजर ही आग अधिक पसरली असती, तर विद्युत वायरमुळे संपूर्ण परिसराला धोका निर्माण झाला असता; परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला. या प्रकारामुळे लाडके कुटुंबावर एकाच वेळी ओढावलेल्या दोन संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी परिसरातील नागरिकांकडून मदतीचा हातभार लावला जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई