शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स रात्री ११, मॉल्स, दुकाने १० पर्यंतच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:21 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील हॉटेल्स, उपाहारगृहे, दुकाने आणि मॉल्सच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार हॉटेल्स व उपाहारगृहे रात्री ११ पर्यंत तर मॉल्स, दुकानांसाठी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. 

प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेच्या वतीने उपाययोेजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून लग्न व सभासमारंभांवर निर्बंध आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची मुभा आहे. त्यासाठी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यापाठोपाठ आता हॉटेल्स व दुकानांच्या वेळातसुध्दा बदल करण्यात आला आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याने हॉटेल्स, कॅफे, उपाहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती. तर मॉल्स आणि सर्व प्रकारच्या दुकानांसाठी रात्रीच्या ११ पर्यंतची वेळ निर्धारित करण्यात आली होती. परंतु नव्या आदेशानुसार हॉटेल्स, कॅफे आणि उपाहारगृहे  ५० टक्के क्षमतेसह रात्री ११ वाजेपर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. तर मॉल्स आणि दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. ९ मार्चपासून नवीन आदेश लागू करण्यात आले आहेत. या नवीन वेळापत्रकाचे संबंधित व्यवस्थापनांनी पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई