शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांच्या बंदीनंतर हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:19 IST

कर्मचाऱ्यांची कमतरता; पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद

- नामदेव मोरे नवी मुंबई : सहा महिन्यांच्या बंदीनंतर हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी अनेकांनी स्वच्छता व इतर कामे करण्यास प्राधान्य दिले. जी हॉटेल सुरू झाली, तेथेही ग्राहकांचा थंड प्रतिसाद असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.शासनाने पहिला लॉकडाऊन जाहीर केल्यापासून नवी मुंबईमधील लहान-मोठी जवळपास तीन हजार हॉटेल बंद करण्यात आली. सहा महिन्यांत जवळपास १,२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. हॉटेल भाडेतत्त्वावर चालविणाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पुन्हा हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. काम करण्यासाठी कर्मचाºयांची कमतरता आहे. बंद असल्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा खर्चही वाढला असून, इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत.घेतली जाणारी दक्षता : हॉटेलमध्ये येणाºया सर्वांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तापमान तपासण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली असून, आॅक्सिजनची पातळीही तपासली जात आहे.हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून, क्षमतेपेक्षा ५० टक्के ग्राहकांसाठीची आसनव्यवस्था केली जात आहे.स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधनेमहानगरपालिकेने ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे, परंतु नागरिकांनी व हॉटेल चालकांनीही हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही व कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.-प्रशांत पवार,ग्राहककोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वाधिक नुकसान हॉटेल व्यावसायिकांचे झाले आहे. कटू आठवणी विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहोत. नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवले जाईल.-अशोक वाळूंज,हॉटेल व्यावसायिकदर जैसे थे?कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुन्हा हॉटेल सुरू केल्यानंतर हॉटेलच्या मेनूच्या दरामध्ये बदल करण्यात आलेले नाही. पूर्वीचेच दर ठेवण्यात आले आहेत. यापुढे ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर दर अवलंबून राहतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या