शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालयात हातमोजेही नाहीत; जखमी वृद्धास मेडिकलच्या रांगेत उभे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:10 IST

महापालिका रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जखमी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचा-यांकडे हातमोजेही नसल्याने त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : महापालिका रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जखमी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचा-यांकडे हातमोजेही नसल्याने त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. जखमी वृद्धालाही उपचारापूर्वी हातमोजे खरेदी करण्यासाठी मेडिकलच्या रांगेत उभे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रुग्णालय प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमध्ये सातत्याने आरोग्य विभागाचे वाभाडे निघत आहे. स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी रुग्णालयामध्ये औषधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. रुग्णांना खाजगी मेडिकलमधून औषधे घेवून येण्यासाठी दिलेली चिठ्ठीही सभागृहात दाखविली होती, परंतु यानंतरही औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये डॉक्टर व इतर कर्मचाºयांकडे हातमोजेही नाहीत. मंगळवारी ८० वर्षांचे वृद्ध प्रसाद जैसवाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ते उपचारासाठी वाशी रुग्णालयात गेले होते. त्यांना डॉक्टरांनी मेडिकलमधून हातमोजे विकत आणण्यास सांगितले. वृद्ध नागरिकाचा पाय व पादत्राणेही रक्ताने भरली होती. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणाने वृद्धाला प्रसाधनगृहात नेवून त्याचा पाय व पादत्राणे धुवून दिली व पुन्हा उपचारासाठी रांगेत उभे केले. मेडिकलमधून हातमोजे आणल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. इंदिरानगरमध्ये राहणाºया सुनील स्वामी या तरुणाचा दोन दिवसापूर्वी मानखुर्दमध्ये अपघात झाला होता. उपचारासाठी तो सोमवारी रुग्णालयात गेला होता. रुग्णालय व्यवस्थापनाने त्यालाही औषधांची चिठ्ठी दिली. मेडिकलमध्ये गेल्यानंतर ती औषधे नसून हातमोजे असल्याचे निदर्शनास आले. १८ रुपये खर्च करून हातमोजे आणल्यानंतरच त्याच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णालयामध्ये हातमोजेही नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.इंदिरानगर परिसरामध्ये राहणारा विकास घाबाळे हा पाचवीत शिकत असलेला मुलगा २० फेब्रुवारीला शिडीवरून पडला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला उपचारासाठी आणल्यानंतर आजीकडून त्याचे नाव विकासऐवजी आकाश सांगण्यात आले. चार दिवसांपूर्वी हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजीने नाव दुरुस्त करण्याची विनंती डॉक्टरांना केली. परंतु ही अपघाताची घटना आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये जावून पोलिसांकडून लिहून आणा असे सांगण्यात आले. चार दिवस अधिकाºयांना विनंती केल्यानंतरही प्रशासनाने दाद दिली नाही. याविषयी माहिती मिळताच शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी डॉक्टरांची भेट घेतली. क्षुल्लक कारणांसाठी गरीब रुग्णांना त्रास दिला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर नावात दुरुस्ती करून देण्यात आली. अशाप्रकारे रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या लुबाडणूक व अडवणुकीविषयी माहिती घेण्यासाठी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होवू शकला नाही.कधी होणार सुधारणा?महापालिकेच्या आरोग्य विभागाविषयी महासभा व स्थायी समितीमध्ये सातत्याने टीका होवू लागली आहे. नागरिकांनीही अनेक तक्रारी केल्या आहेत. औषधांचा तुटवडा असल्याचे स्थायी समिती सभापतींनीही निदर्शनास आणून दिले होते. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून आरोग्य विभागाच्या कामकाजामध्ये नक्की कधी सुधारणा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अपघात झाल्यामुळे उपचारासाठी मनपा रुग्णालयामध्ये गेलो होतो. डॉक्टरांनी मेडिकलमधून हातमोजे विकत आणायला लावले, त्यानंतर उपचार सुरू केले. जखमी वृद्धासही हातमोजे विकत आणायला लावले.- सुनील स्वामी,जखमी तरुणइंदिरानगरमधील मुलगा शिडीवरून पडल्याने रुग्णालयात दाखल केले होते. नावात बदल करण्यासाठी पोलिसांचा दाखला आणण्यास भाग पाडले जात होते. रुग्णांची अशाप्रकारे होणारी अडवणूक थांबली पाहिजे यासाठी पालकमंत्री व खासदारांकडेही तक्रार करणार आहोत.- महेश कोठीवाले,शाखा प्रमुख शिवसेना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल