शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोळी आगरी महोत्सवात हास्यकल्लोळ

By admin | Updated: February 3, 2016 02:23 IST

ऐरोली येथील कोळी आगरी महोत्सवाची सांगता प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात झाली. महोत्सवाच्या अंतिम दिनी उपस्थित हास्य कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते

नवी मुंबई : ऐरोली येथील कोळी आगरी महोत्सवाची सांगता प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात झाली. महोत्सवाच्या अंतिम दिनी उपस्थित हास्य कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. महोत्सवादरम्यान प्रकल्पग्रस्तांचे नेते श्याम म्हात्रे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.मी नवी मुंबईकर प्रतिष्ठान आयोजित कोळी आगरी महोत्सवाची सांगता रविवारी प्रेक्षकांच्या अलोट गर्दीने झाली. या महोत्सवाच्या माध्यमातून ऐरोली कोळीवाडा येथे पाच दिवस विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू होता. आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवत नृत्य स्पर्धा, लोकगीते, कोळीगीते अशा अनेक कार्यक्रमांचा आनंद नागरिकांनी घेतला. प्रतिष्ठानचे आयोजक अ‍ॅड. रेवेंद्र पाटील यांनी चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सांगता रविवारी मोठ्या उत्साहात झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते श्याम म्हात्रे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. सेंट अँजेलोस इन्स्टिट्यूटचे प्रमुख राजेश अर्थडे यांच्या हस्ते उपआयुक्त सुरेश मेंगडे, निवृत्त सहाय्यक आयुक्त वसंत ढोबळे यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कोळी आगरी समाजाने एकत्र होवून प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातला लढा बळकट करण्याची गरज श्याम म्हात्रे यांनी व्यक्त केली. महोत्सवाच्या सांगता प्रसंगी खासदार राजन विचारे, शिवसेना नेते अनंत तरे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी मान्यवरांनी देखील उपस्थिती दर्शवली.महोत्सवात प्रेक्षकांना हसवून सोडण्यासाठी ‘चला हवा येवू द्या’चे कलाकार उपस्थित झाले होते. त्यानुसार भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या कलाकारांनी प्रेक्षकांना बसल्या जागी हास्याने खिळवून ठेवले. त्यांची ही अदाकारी पाहण्यासाठी लहान मुलांसह महिला व पुरुष प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी बालकलाकारांनी देखील अंगीकृत कला सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. (प्रतिनिधी)