शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

तळा बसस्थानक समस्यांचे माहेरघर; एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:25 IST

अत्यंत दयनीय अवस्था

तळा : तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण असलेले तळा बसस्थानक अनेक सोईसुविधांच्या कमतरतेमुळे समस्यांचे माहेरघर बनले आहे. तळा तालुक्यात एसटी हे दळणवळणाचे एकमेव साधन असून, कोरोनाचा काळ सोडला, तर दिवसभर जवळजवळ ८० ते ८५ एसटीच्या फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे तळा बस स्थानकात प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. मात्र, स्थानकात अनेक सोईसुविधांची कमतरता असल्याने, बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.अद्यापही आवारात काँक्रिटीकरण व पाणपोईची व्यवस्था नाही.

२०११च्या दरम्यान ८ लाख रुपये खर्च करून पत्राशेड बांधून तळा येथे बस स्थानक उभारण्यात आले. मात्र, स्थानकातील आवारात अद्यापही काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असून, येणाऱ्या-जाणाऱ्या, तसेच बस स्थानकात बसलेल्या प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नूतन बसस्थानक तयार झाल्यापासून आजपर्यंत बस स्थानकात पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. रात्री वस्तीला असलेल्या बस चालक व कंडक्टरलाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने इतरत्र जाऊन पाणी आणावे लागत आहे.  त्यामुळे एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बस स्थानकात असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पाण्याअभावी बस स्थानक परिसरात दुर्गंधी

बस स्थानकात असलेल्या नळाला गेल्या सहा महिन्यांपासून पाणी येत नसल्याने, येथे असलेल्या शौचालय व मुतारीची दुरवस्था झाली आहे. पाण्याअभावी शौचालय व मुतारीची व्यवस्थितपणे स्वच्छता होत नाही. अस्वच्छतेमुळे काही जण बाहेरच लघुशंका उरकतात. त्यामुळे बस स्थानक परिसरात सातत्याने उग्र वास येत असतो. येथील नागरिक व महिला प्रवाशांना कायम नाकाला रुमाल बांधून ये-जा करावी लागते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई