शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महामार्ग अंधारातच, फक्त ‘फिफा’साठी लावले होते दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:13 IST

सायन - पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे. अनेक महिन्यांपासून वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवेही बंद असून, त्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. मागणी करूनही पथदिवे सुरू केले जात नसल्याने प्रवाशांसह वाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईत येण्यासाठी सायन - पनवेल हाच प्रमुख मार्ग आहे. या रोडवरून रोज दोन लाख वाहनांची ये - जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण केले. विस्तारीकरणासाठी ठेकेदाराने केलेला खर्च भरून काढण्यासाठी खारघरमध्ये ६ जून २०१५मध्ये टोलनाकाही सुरू केला आहे; परंतु ठेकेदाराने कामे पूर्ण केली नाहीत व नवीन रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महामार्गाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दीड वर्षामध्ये महामार्गाने १०५ बळी घेतले आहेत. वाशी ते कळंबोली दरम्यान २० किलोमीटर रोडवरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. महामार्गावरील विजेच्या पोलवर फुलपाखरांची नक्षी बसविण्यात आली होती. महामार्गावर बटरफ्लाय दिवे असा गवगवा करण्यात आला होता; पंरतु प्रत्यक्षात हे दिवे कधी पेटलेच नाहीत. ‘फिफा’ वर्ल्डकपदरम्यान गतवर्षी महामार्गावरील दिवे सुरू करण्यात आले होते; परंतु ‘फिफा’चे सामने संपताच दिवे पुन्हा बंद झाले आहेत. महामार्ग अंधारात असल्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. दीड वर्षामध्ये २५०पेक्षा जास्त अपघात होऊन १०५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील अनेक अपघात रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे झाले आहेत. उरण फाटा येथे ९ जुलैला अंधारामुळे टँकर १०० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली होती. तुर्भे शरयू हुंदाई शोरूमजवळ अंधारामुळे गटार दिसत नसल्यामुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत.सानपाडा उड्डाणपुलाजवळ अंधारामुळे आठवड्याला एकतरी अपघात होत आहे. महामार्गावरील पथदिवे सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. खड्डे व विजेच्या समस्यांसाठी आंदोलनही केले आहे; परंतु यानंतरही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. महामार्गावरील पथदिव्यांची नक्की जबाबदारी कोणाची यावरून टोलवा टोलवी सुरू आहे. वाहतूक पोलिसांनीही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.>पालकमंत्र्यांनी दिले आदेशसायन - पनवेल महामार्गावर अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनाही याविषयी माहिती नव्हती. अधिकाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांनाही या विषयी माहिती देता आली नाही. शिंदे यांनी या विषयी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.>अंधारामुळे अपघात होणारी ठिकाणेसानपाडा उड्डाणपूल, तुर्भे शरयू हुंडाई शोरूम समोरील रस्ता, शिरवणे पूल, उरण फाटा, बेलापूर उड्डाणपूल, कळंबोली या ठिकाणी अंधारामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.>दीड वर्षातील अपघातांचा तपशीलठिकाणी अपघात मृतपनवेल ३९ १४कळंबोली १८ ०९खारघर ५० २५बेलापूर १८ ०७नेरु ळ ३५ १५सानपाडा ०८ १२वाशी ७६ १३>सायन - पनवेल महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, वारंवार अपघात होत आहेत. खड्ड्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला होता. पथदिवे लवकर सुरू केले नाहीत, तर पुन्हा आंदोलन केले जाईल.- गजानन काळे,शहर अध्यक्ष,मनसे