शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत सत्ताधाऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती

By admin | Updated: April 28, 2017 00:43 IST

सर्वसाधारण सभेमध्ये दोन वर्षांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी व काँगे्रस नगरसेवकांनी शिस्तबद्ध कामकाज करून सर्वाधिक

नवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये दोन वर्षांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी व काँगे्रस नगरसेवकांनी शिस्तबद्ध कामकाज करून सर्वाधिक उपस्थिती दर्शविली आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये शिस्तीचा अभाव आढळून आला असून, अर्ध्यावर सभा सोडून जाणाऱ्यांमध्ये शिवसेना नगरसेवक आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये प्रत्येक महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे. शहरातील विकासकामांना व पालिकेच्या धोरणांना या सभेत मंजुरी दिली जात असते. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सदस्यांची उपस्थिती व कामकाजामधील अभ्यासपूर्ण सहभागावरच शहराच्या विकासाची दिशा ठरत असते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून कामकाजाची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक सभेपूर्वी मीटिंग घेवून पक्षाची भूमिका निश्चित केली जात आहे. सभा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत प्रत्येक नगरसेवकांनी उपस्थित राहावे अशा स्पष्ट सूचना नगरसेवकांना देण्यात येतात व नगरसेवकही त्या सूचनांचे तंतोतंत पालन करत असल्याचे पहावयास मिळते. अपवाद वगळता सर्व नगरसेवक सभेमध्ये उपस्थित असतात. काँगे्रसचे नगरसेवकही सभा संपेपर्यंत कामकाजामध्ये सहभागी होत असतात. परंतु विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये मात्र शिस्तीचा अभाव आढळून येवू लागला आहे. शिवसेनेचे निवडून आलेले ३८ व २ स्वीकृत नगरसेवक आहेत. सभा सुरू झाल्यानंतर यामधील बहुतांश नगरसेवक उपस्थित असतात, पण दुपारनंतर १० ते १५ जणच सभेमध्ये उपस्थित असतात. शिवसेना नगरसेवक सभेमध्ये थांबतच नसल्याने विरोधी पक्षाला पालिकेच्या कामकाजाविषयी गांभीर्य नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षागृहात असलेल्या नागरिकांकडूनही टीका होवू लागली आहे. सेनेचे अनेक नगरसेवक आक्रमकपणे भूमिका मांडत असले तरी त्यांना साथ देण्यासाठी सहकारीच उपस्थित रहात नाहीत. अनुपस्थित राहून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवकांना शिस्त लावायची कोणी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पासह इतर सर्वच सभांमध्ये विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या दिसू लागल्या आहेत. भाजपाचे फक्त सहाच नगरसेवक आहेत. यामध्ये गटनेते रामचंद्र घरत वगळता इतर एकाही नगरसेवकांना अद्याप सभागृहात प्रभाव पाडता आलेला नाही. अनेक वेळा भाजपाचे नगरसेवकही सभागृहात पूर्णवेळ नसल्याचे पहावयास मिळते व सभागृहात असूनही कामकाजामध्ये सहभागी होत नाहीत. विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या -२६ एप्रिलला झालेल्या तहकूब सभेमध्ये शिवसेना भाजपा नगरसेवकांची बाके रिकामीच होती. ४६ पैकी फक्त १५ नगरसेवक उपस्थित होते. तब्बल ३१ जणांनी दांडी मारली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी व काँगे्रस नगरसेवकांची उपस्थिती लक्षणीय असल्याने सभेचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये व प्रसारमाध्यमांमधून सत्ताधाऱ्यांमध्ये सकारात्मक व विरोधकांमध्ये सकारात्मक प्रतिमा तयार होत आहे.