शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिलांना पोलिसांचे मनोधैर्य लाभदायी

By admin | Updated: April 25, 2017 01:15 IST

विविध प्रकरणांमध्ये पीडित असलेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी पोलिसांकडून मनोधैर्य योजना राबवली जात आहे.

नवी मुंबई : विविध प्रकरणांमध्ये पीडित असलेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी पोलिसांकडून मनोधैर्य योजना राबवली जात आहे. त्याकरिता पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत मागील दीड वर्षात १७२ पीडित महिलांना मानसिक आधार देण्यात आलेला आहे.महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान पीडित महिलांना मानसिक आधार देण्याचे देखील कार्य पोलिसांकडून केले जात आहे. त्याकरिता गुन्हे शाखेअंतर्गत विशेष शाखा तयार करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे- अल्फांसो यांच्यावर या पथकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पथकाने मागील दीड वर्षात १७२ पीडित महिलांची भेट घेवून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले आहे.कौटुंबिक वाद, लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकरणांमध्ये पीडित असलेल्या महिलांकरिता ही शाखा कार्यरत आहे. नवी मुंबई आयुक्तालयात मागील अडीच वर्षात ४०० महिला विविध प्रकरणांमध्ये पीडित झाल्या आहेत. अनेकदा घडलेल्या प्रसंगानंतर त्यातून सावरण्यासाठी पीडित महिलेला आधाराची गरज असते. मात्र कुटुंबाकडून हा अपेक्षित आधार न मिळाल्यास त्या महिलेच्या भावी आयुष्यावर परिणाम उमटू शकतात. हे टाळण्यासाठी पोलिसांनी मनोधैर्य संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यानुसार अल्फान्सो यांच्या पथकाने २०१६ मध्ये १३८ तर चालू वर्षात ३४ पीडित महिलांची भेट घेवून त्यांना धीर दिला. शिवाय त्यांना अद्यापही संबंधितांकडून त्रास होत आहे का याची चौकशी केली. त्यापैकी ६३ पीडित महिलांची माहिती महिला व बालविकास कार्यालयाला कळवण्यात आली आहे. दरम्यान, ६ पीडित महिलांना संबंधितांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे समोर आले. याची दखल घेत त्रास देणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये देखील महिला अत्याचाराच्या बळी पडू नयेत, याकरिता कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले जात आहे, तर अद्यापपर्यंत विविध कार्यालये व कार्यक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शिका वाटून महिलांमध्ये जागृती करण्यात आलेली आहे. यामुळे बहुतांश प्रमाणात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसलेला आहे. (प्रतिनिधी)