नवी मुंबई : शहरात आरटीईनुसार होणारी शाळांची प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप मनविसेतर्फे करण्यात आला होता. याप्रकरणी पालिका शिक्षण मंडळाकडे तक्रार करून संबंधित खासगी शाळांकडून नियमांचे पालन करून घेण्याची मागणी केली होती. यानुसार शिक्षण मंडळातर्फे मदत केंद्राची व पात्र शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता खासगी शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेशाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे प्रवेश आॅनलाइन प्रक्रियेद्वारे देण्यात येतात. परंतु खासगी शाळांकडून ही आॅनलाइन प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आला होता. तसेच यासंबंधीचे पत्र शिक्षण मंडळाला देवून त्रुटींमध्ये सुधाराची सूचना केली होती, अन्यथा आंदोलनाचा इशारा मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला.
आरटीईनुसार प्रवेशासाठी मदत केंद्रे
By admin | Updated: February 15, 2017 04:56 IST