शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वसाहतीत अवजड वाहनांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:23 IST

अपघाताची शक्यता : दळणवळण यंत्रणेचा बोजवारा; महापालिकेसह वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

नवी मुंबई : सुनियोजित शहराची बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई नगरीला अवैध पार्किंगचा विळखा पडला आहे. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत रस्त्यांवरही बेकायदा पार्किंगचे पेव फुटले आहेत. मोकळे रस्ते दुर्मीळ झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रवेश निषिद्ध असलेल्या अवजड वाहनांनीही आता नागरी वसाहतीतील रस्त्यांवर शिरकाव केला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या महापालिकेसह वाहतूक विभागाने या प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक केल्याने आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मागील दोन दशकांत नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबर येथील उद्योगधंदेही वाढीस लागले. त्यानुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. शहर उभारताना पार्किंगचे सुयोग्य नियोजन झाले नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. रस्ते अपुरे पडू लागले आहेत. पार्किंगच्या सुविधा नसल्याने वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत अरुंद रस्तेही आता वाहनांच्या पार्किंगला अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने परिसरातील दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्यांवर दुतर्फा पार्क केल्या जाणाºया वाहनांमुळे दैनंदिन साफसफाईचा प्रश्नही उद्भवू लागला आहे. मागील २० वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विस्तारित होणाºया या समस्येकडे येथील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनानेही या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. याचा परिणाम म्हणून आज या समस्येने आक्राळ स्वरूप धारण केले आहे. सुनियोजित शहराचा पुरता बोजवारा उडाला आहे.मागील काही महिन्यांपासून नागरी वसाहतीतील अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांचा वावर दिसू लागला आहे. यात ट्रक, टँकर, मोठे ट्रेलर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्सच्या गाड्या आदीचा समावेश आहे. अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असतानाही नागरी वसाहतीतील रस्त्यांवर या गाड्यांच्या रांगा दिसून येताता. नागरी वसाहतीतील रस्त्यांवर अवजड वाहने पार्क केल्याने त्या परिसरातील दळणवळणाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. स्कूल बस आणि रुग्णवाहिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.पार्किंग नसल्याने समस्यातुर्भे येथील एपीएमसीची सर्वात मोठी बाजारपेठ, ट्रान्स हार्बर मार्गावरील अशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आणि जेएनपीटी बंदर आहे. तसेच सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूरमार्ग हे महत्त्वाचे रस्ते नवी मुंबईतून जातात. यातच मागील दोन दशकांत शहरात आयटी उद्योगाचे जाळे पसरले आहे. येथे नोकरी करणाºयांना गलेलठ्ठ पगार असल्याने वाहन ही गरजेपेक्षा हौसेची बाब बनली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नवी मुंबईत वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येते. त्या तुलनेत शहरात पार्किंगच्या सुविधा नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.एपीएमसीतील ट्रक शहरातील रस्त्यांवरमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ तुर्भे येथे आहे. या बाजारपेठेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयातून दरदिवशी कृषिमालाची शेकडो वाहने येतात.या वाहनांच्या पार्किंगसाठी सेक्टर १९ येथे विस्तीर्ण ट्रक टर्मिनल बनविण्यात आले आहे; परंतु आता हे ट्रक टर्मिनलही अपुरे पडू लागले आहे. याचा परिणाम म्हणून एपीएमसी परिसरातील रस्त्यांवर ट्रक पार्क केले जात आहेत.आता तर या अवजड वाहनांनी आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील रस्त्यांवर आपला विस्तार वाढविला आहे. या परिस्थितीला वेळीच निर्बंध घातले गेले नाहीत, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागतील, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई