शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: April 23, 2016 02:10 IST

सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने आदिवासी बांधव व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा ही विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहे.

विनोद भोईर,  पालीसुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने आदिवासी बांधव व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा ही विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. तसेच तालुक्यात पाली, जांभुळपाडा असे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व १४ उपआरोग्य केंद्रे आहेत, परंतु निम्म्याहून अधिक केंद्रे पाणी नसल्याने बंद आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा आरोग्य सेवेलाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. सुरु असलेल्या केंद्रामध्येही सुविधांचा अभाव तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा कोलमडली आहे, यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त के ला जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे रात्री सेवा उपलब्धच नसते. काही ठिकाणी औषधांचाही तुटवडा आहे तर पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी काही दिवस रजेवर गेले असल्याने तालुक्यातील रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी हे पुढील शिक्षणासाठी बाहेर गेल्याने ते पद ही रिक्त आहे. तसेच एक आरोग्य सेविका, एक वैद्यकीय अधिकारी आदि पद पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी आहेत तर तालुक्यातील उपकेंद्र उध्दर, आपटवणे, राबगांव, सिध्देश्वर, पेडली, हातोंड येथे आरोग्य सेवक, सेविकांचे पद रिक्त आहे.राबगांव उपकेंद्र कित्येक वर्षे भाड्याच्या जागेत सुरु आहे. इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गेली दोनवर्षे निधी परत जात आहे. पेडली उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली, परंतु ती शासनाने ताब्यात घेतली नाही. कारण ती इमारत खासगी मालकाच्या जागेत त्यांची कोणतीही परवानगी न घेता बांधली आहे. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे. निवासाची सोय असूनही या ठिकाणी अधिकारी राहत नाही. त्यामुळे तेथे रात्रीची सेवा मिळत नाही.