शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आरोग्य अधिकारी पत्तीवार यांची स्वेच्छानिवृत्ती

By admin | Updated: June 28, 2016 02:10 IST

महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांनी पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

नवी मुंबई : महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांनी पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तशा आशयाचा अर्ज त्यांनी महापालिका आयुक्तांकडे सादर केल्याचे समजते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका सुरू केला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे. तर कामात अनियमितता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. त्याचबरोबर वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय बदल्या केल्या आहेत. एकूणच आयुक्त मुंढे यांच्या या बेधडक कार्यप्रणालीचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. डॉ. संजय पत्तीवार यांच्या कार्यप्रणाली नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. असे असतानाही प्रशासनाने मुख्य वैद्यकीय पदावरून त्यांची थेट महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. परंतु आयुक्त मुंढे यांनी अलीकडेच पत्तीवार यांची ही नियुक्ती बेकायदा ठरवत त्यांची पुन्हा मूळ पदावर नियुक्ती केली आहे. गेल्या आठवड्यातील स्थायी समितीत नगरसेवक एम.के. मढवी यांनी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचत या परिस्थितीला सर्वस्वी डॉ. पत्तीवार हेच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत आयुक्त मुंढे यांनी संपूर्ण आरोग्य विभागासह डॉ. पत्तीवार यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच डॉ. पत्तीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात डॉ. पत्तीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. (प्रतिनिधी)