शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 02:08 IST

विकासाच्या नावाखाली पनवेल परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबरोबर वायू प्रदूषणही वाढले आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईविकासाच्या नावाखाली पनवेल परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबरोबर वायू प्रदूषणही वाढले आहे. पूर्ण वर्षभर धूळ व धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलली नाहीत तर शहरवासीयांना श्वसनाचे व हृदयाशी संबंधित आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना क्षेत्रामुळे पनवेल देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे. ग्रामीण परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. परंतु शहराची रचना करताना फक्त इमारतींची उभारणी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरण रक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास सुरू झाला आहे. गाढी नदीचे नाल्यात रूपांतर होवू लागले आहे. मँग्रोजचे जंगल नष्ट केले जात आहे. लोकवस्तीच्या प्रमाणात उद्यानांसाठी भूखंड राखीव ठेवलेले नाहीत. वाहनांची संख्या दहा वर्षांत जवळपास तिप्पट झाली आहे. या सर्वांमुळे वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण विभागाने २०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये हवेतील सल्फरडाय आॅक्साईड व नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण नियंत्रणात असले तरी रेस्पीरेबल सस्पेंडेड पार्टीक्युलर मॅटर (आरएसपीएम) चे प्रमाण मात्र मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. धुलीकण हे सूक्ष्मकण व ऐरोसोल यांचे क्लिष्ट मिश्रण असून धुलीकण प्रदूषण या नावानेही ओळखले जातात. नायट्रेड व सल्फेटसारखी आम्ल, सेंद्रिय रसायने, धातू व धुलीकण यासारख्या घटकांचा समावेश असणाऱ्या घटकांपासून धुलीकणाची निर्मिती होत असते. १० मायक्रॉन व त्याहीपेक्षा कमी व्यास असलेले धुलीकण घसा व नाकामार्फत फुप्फुसात प्रवेश करू शकतात. श्वासामार्फत धुलीकण शरीरात गेल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम हृदय व फुप्फुसांवर होत असतो. हवेतील आरएसपीएम १० ची मात्रा ८० ते १०० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर असणे आवश्यक आहे. परंतु पनवेल शहरात हेच प्रमाण वर्षभरामध्ये जवळपास १३८ एवढे असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय हवेतील एसपीएमचे प्रमाण निवासी क्षेत्रामध्ये २०० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. परंतु हे प्रमाणही सरासरी २२८ असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखला नाही तर भविष्यात शहरवासीयांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सिडकोने साऊथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु स्मार्ट शहर बनविताना पर्यावरण रक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.