शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेचे मुख्यालय टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 03:56 IST

पनवेल महानगर पालिकेचे मुख्यालय कात टाकणार आहे. सध्याच्या घडीला दोन वेगवेगळ्या इमारतींच्या माध्यमातून प्रशासनाचे कामकाज चालत आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगर पालिकेचे मुख्यालय कात टाकणार आहे. सध्याच्या घडीला दोन वेगवेगळ्या इमारतींच्या माध्यमातून प्रशासनाचे कामकाज चालत आहे. या दोन्ही इमारतींना विशेष पद्धतीने एकसंघ करून या दोन्ही इमारती एकच असल्याचा भास या नव्या प्रस्तावानुसार निर्माण केला जाणार आहे.पनवेल महापालिकेची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली आहे. तत्पूर्वी याठिकाणी नगरपरिषद अस्तित्वात होती. १८५२ साली स्थापन झालेली महाराष्ट्रातील ही पहिली नगरपरिषद होती. पनवेल शहरात देवाळे तलावासमोरच असलेल्या इमारतीतून नगरपरिषदेचे कामकाज चालत असे. २0१६ मध्ये नगरपरिषदेचे रूपांतर महापालिकेत करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने जुन्या इमारतीच्या बाजूलाच आणखी एक नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, विषय समित्यांचे सभापतींची दालने तयार करून त्याठिकाणाहून कामकाज सुरू करण्यात आले, तर जुन्या इमारतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची दालने आहेत. यात आयुक्त, उपायुक्त, विविध विभाग अधिकाºयांच्या दालनाचा समावेश आहे. या दोन्ही इमारतींना जरी पालिकेचे मुख्यालय संबोधले जात असले तरी या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आजूबाजूला असलेल्या या दोन इमारती एकसंघ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.मुख्यालयाच्या जागेसाठी पालिका प्रशासन व सिडको यांच्यात चर्चा सुरू आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर त्यावर मुख्यालयाची इमारत उभारण्यसाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. या काळात कामकाजात होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सध्याचे मुख्यालय प्रशस्त व एकसंघ करण्याची संकल्पना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मांडली आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी महापालिकांचे मुख्यालय प्रशस्त व देखणे आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेचे मुख्यालय सुद्धा प्रशस्त व आकर्षक करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या प्रस्तावानुसार पालिकेच्या दोन्ही इमारतींच्या पृष्ठभागाला काचेचे आवरण लावले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन्ही इमारतींची रचना एकत्रित केली जाणार आहे. याकरिता सुमारे एक कोटीच्या आसपास खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात पालिकेचे मुख्यालय याठिकाणाहून स्थलांतरित झाले तरी सुद्धा पालिका रु ग्णालय, प्रभाग कार्यालयाचे कामकाज सुंदर व भव्य वास्तूमधून चालवता येणार आहे.आज होणार निर्णयसोमवारी पार पडणाºया महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर रीतसर टेंडर नोटीस काढून ते मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवले जाणार असल्याची माहिती शहर अभियंते संजय कटेकर यांनी दिली.एक कोटीचा खर्च : या प्रस्तावानुसार पालिकेच्या दोन्ही इमारतींच्या पृष्ठभागाला काचेचे आवरण लावले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन्ही इमारतींची रचना एकत्रित केली जाणार आहे. याकरिता सुमारे एक कोटीच्या आसपास खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात पालिकेचे मुख्यालय याठिकाणाहून स्थलांतरित झाले तरी सुद्धा पालिका रु ग्णालय, प्रभाग कार्यालयाचे कामकाज सुंदर व भव्य वास्तूमधून चालवता येणार आहे.पालिकेचे मुख्यालय हे देखणे असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. पालिकेत भेट देणारे नागरिक देखील याबाबत सूचना करत असतात. त्यादृष्टीने मुख्यालय दोन इमारतीत न विभागता एकत्रित करण्याचा हा प्रस्ताव आहे. यामुळे पालिकेच्या मुख्यालयाला आधुनिक रूप प्राप्त होणार आहे- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल