शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीचे लायसन्स मिळण्यासोबतच कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:11 IST

रजनी पंडित यांचा ऑनलाइन संवाद

नवी मुंबई :  नागरिकांना समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी किंवा इतर बाबतीत माहिती काढण्यासाठी हेरगिरी काळाची गरज असल्याचे मत पहिल्या महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांनी व्यक्त केले. यासाठी आजवर कायदा होऊ न शकल्याची खंतही व्यक्त केली.रविवारी ७ फेब्रुवारी रोजी मिती ग्रुपच्या उत्तरा मोने आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. या कार्यक्रमात पंडित यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना आलेली आव्हाने आणि त्यावर मात करत त्यांनी मिळवलेल्या यशाविषयी चर्चा करण्यात आली.डिटेक्टिव्हसाठी परदेशात लायसन्स दिले जातात. त्यामुळे ते पोलिसांप्रमाणे काम करू शकतात. आपल्या देशात डिटेक्टिव्हसाठी लायसन्स दिले जात नाही. त्यामुळे अनेक वेळा अडचणी येत असल्याचे सांगत डिटेक्टिव्ह काळाची गरज असून, याबाबत कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे पंडित म्हणाल्या. आलेल्या प्रसंगाशी दोन हात कसे करायचे, याचे ज्ञान लहानपणापासून असल्याने कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नसल्याचे त्यांनी सांगितले. हेरगिरी करताना घडलेले अनेक किस्सेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीची लोक अन्याय सहन करायचेे. आता मोहासाठी अनैतिक गोष्टींचे आकर्षण वाटले की ते वाहत जातात. गैरफायदा घेणे, ब्लॅकमेल करणे, अशा गोष्टीही घडतात. त्यामध्ये आत्महत्या हा पर्याय नसून, झालेली चूक सावरण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समस्येतून संधी शोधली पाहिजे आणि त्यातून आपले पुढचे आयुष्य घडवले पाहिजे, असा सल्ला देत लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच ऐश्वर्य असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कामाची नोंद अनेकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असून, तो आमचा हेतू साध्य झाल्याचे मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांनी सांगितले. बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्या कार्याचे कौतुक करत पंडित या फक्त महाराष्ट्राचा अभिमान नसून रणरागिणी असल्याचे म्हटले.मुलांना वेळ देणे गरजेचेपालक कामांमुळे त्रासलेले असतात. त्यामुळे पालक आणि मुलांमधील संवाद फार कमी झाला आहे. आपली मुले बाहेर काय करतात, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असून मुलांच्या मनात चांगले विचार रुजविणे, मुलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना वेळ देणे तितकेच गरजेचे आहे, अनेकदा मुले व्यसनांकडे वळत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.