शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारात, मध्यस्थांची साखळी खंडित

By नामदेव मोरे | Updated: May 2, 2024 20:01 IST

ग्राहकांची फसवणूक थांबविण्यातही यश

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईस्थित कोकणवासीयांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमास ग्राहकांचाही प्रतिसाद वाढत आहे. मध्यस्थांची साखळी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व ग्राहकांनाही स्वस्त व उत्तम दर्जाचा हापूस मिळू लागला आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे ही हापूस आंब्याची देशातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ आहे. सर्वाधिक आंबा याच परिसरात विकला जातो. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हा आंबा विक्रीसाठी एकमेव पर्याय होता; परंतु मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून स्थिरावलेले कोकणवासीय नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत आंबा पाेहोचविला जात आहे. या उपक्रमाशी अनेक मुंबईकर जोडले जात आहेत. आपल्या संपर्कामधील नागरिकांकडून आंब्याची ऑर्डर नोंदविली जाते. शेतकऱ्यांना किती आंबे लागणार हे कळविले जाते. या मागणीप्रमाणे शेतकरी ट्रकमधून आंबे पाठवून देतात. प्रत्येक विभागात तो पाठविला जातो.

नवी मुंबईमध्ये सीवूड, वाशीसह शहरातील अनेक भागांत अशाप्रकारे कोकणातून थेट आंबा विक्रीसाठी येत आहे. मुंबईमध्येही आंबा महोत्सवाच्या माध्यमातून थेट आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे.

ग्राहकांना खात्रीशीर कोकणचा हापूस- सद्य:स्थितीमध्ये मार्केटमध्ये कोकणच्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस देण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक आंब्याला देवगडचा हापूस असल्याचे दाखविले जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असते. आंबा महोत्सव व थेट शेतकरी ते ग्राहक योजनेमध्ये ग्राहकांना खात्रीने कोकणचा हापूस उपलब्ध होत आहे.

कोरोना काळापासून आम्ही देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. सी-वूडमधील कवी कुसुमाग्रज वाचनालयाचीही या उपक्रमास साथ मिळते. प्रत्येक वर्षी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- भूषण मालवणकर- सी-वूड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAlphonso Mangoहापूस आंबाMangoआंबा