शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:06 IST

चैत्र शुध्द पौर्णिमेच्या आजच्या दिवशी तालुक्यात सर्वच ठिकाणी हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरापासून जवळच असलेल्या निवी या गावात आदिवासी बांधवांनी

रोहा : चैत्र शुध्द पौर्णिमेच्या आजच्या दिवशी तालुक्यात सर्वच ठिकाणी हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरापासून जवळच असलेल्या निवी या गावात आदिवासी बांधवांनी साधेपणात परंतु मोठ्या उत्साहाने हनुमान जयंतीचा हा धार्मिक उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे या निवी गावातील वाडीवर हे आदिवासी ग्रामस्थ हा उत्सव नित्य नियमाने साजरा करीत आहेत.जयंती उत्सवानिमित्त तालुक्यात बहुतांशी हनुमान मंदिरांना रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात आली होती. भल्या पहाटेपासूनच रोहेकरांनी राम मारुती चौक येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन व पूजाअर्चनेसाठी एकच गर्दी केली होती. येथील मंदिर समितीने जयंती उत्सवानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून हा उत्सव साजरा केल्याचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भावे यांनी सांगितले. खारापटी या गावचे ग्रामदैवत श्री हनुमानाची पालखी मंदिरातून काढून संपूर्ण गावातून मिरवणूक काढत हा दिमाखदार सोहळा साजरा करण्यात आला. भातसई व पिंगळसई हे गाव जयंती उत्सवानिमित्ताने भव्य स्वरूपात संपन्न होणाऱ्या गावयात्रेसाठी प्रसिध्द आहेत, तर अंबेवाडी येथील श्री शनिश्वर मंदिर, हनुमान टेकडी, खारापटी, बिरवाडी, धाटाव एमआयडीसी, यशवंतखार ,करंजविरा, धोंडखार, भागीरथीखार, महादेवखार , हेटवणे आदी ठिकाणीही गावागावातून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)> दासगावमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरीदासगांव : दासगांवच्या पेटकर आळीमध्ये जुन्या काळातील हनुमानाचे मंदिर आहे. अनेक वर्षापासून या पेटकर आळीतील नागरिक एकत्रित येऊन हनुमान जयंती साजरी करतात. त्याचप्रमाणे काल शुक्रवारी सर्वत्र एकत्रित येऊन देवाची पूजा पाठ करत मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी केली. पूर्वपार असलेल्या दासगांव पेटकर आळीतील हनुमान मंदिरात जयंती साजरी करण्यात आली. सकाळी ६ वा. हनुमान मंदिरामध्ये पूजा पाठ करण्यात आली. त्याप्रमाणे देवांच्या पुस्तकांचे वाचचन करण्यात आले. या परंपरेच्या विधीवत कार्यक्रमाला आळीतील नागरिकांनी हजेरी लावली. > हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीमहाड : महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली. शहरातील नवेनगर काकरतळे येथील हनुमान मंदिरातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुंदरवाडी येथील हनुमान मंदिरावर आज सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. > पोलादपूरमध्ये विविध कार्यक्रमपोलादपूर : तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चोळई येथे हनुमान जयंती साजरी करण्यात आली. श्रीहनुमंताच्या मूर्तीला अभिषेक सरपंच संजय कदम यांचे हस्ते करण्यात आला. संध्याकाळी हभप रघुनाथ महाराज वाडकर यांचे प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे विविध कार्यक्र म झाले.> पेणमध्ये १७१ गावांमध्ये हनुमान जन्मोत्सव १पेण : सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे या उक्तीनुसार समर्थ रामदास स्वामींनी यवनांच्या उच्छादाला आवर घालण्यासाठी बलोपासनेसाठी गावोगावी शिवकालखंडात मारु तीची मंदिरे स्थापन केली. २श्रीराम भक्त हनुमान ही रु द्रअवतारी शक्तीची देवता . शुक्रवारी चैत्र शुध्द पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी पेणच्या १७१ गावातील १११ हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. हनुमान हा ्शंकराच्या रु द्रगणापैकी ११ वा रु द्र म्हणून शिवाचा अवतार मानला आहे.३ पेणमधील हनुमान मंदिरांवर दिव्याच्या रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी पेणमधे भक्तीमय वातावरण होते. पेण शिर्की गावात शुक्रवारी पौर्णिमेपासून सतत पाच दिवस हनुमान जन्मोत्सव सोहळा रंगणार असून विविध धार्मिक कार्यक्र माची रेलचेल आहे.