शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावाल्यांपुढे आरटीओने टेकले हात

By admin | Updated: June 13, 2017 03:40 IST

शहरातील अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध संघटनांच्या आडून या अनधिकृत रिक्षा चालत

- सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध संघटनांच्या आडून या अनधिकृत रिक्षा चालत असून त्यांना राजकीय पाठबळ देखील मिळत असल्याचे समजते. यामुळे रिक्षाचालकांची दादागिरी वाढत चालली असून त्यांच्यापुढे आरटीओने देखील हात टेकल्याचे दिसत आहे.सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर भर देण्याची गरज असतानाही नवी मुंबईत मात्र दिवसेंदिवस खासगी रिक्षांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरातील अधिकृत रिक्षांच्या दुप्पट संख्येने परवाना नसलेल्या अनधिकृत रिक्षा चालत आहेत. काही जण गुन्हेगारी हालचालीच्या उद्देशाने रिक्षाचालक बनले असून, काहींनी बेरोजगारीला पर्याय म्हणून रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला आहे. याचाच गैरफायदा घेत काहींनी परवाना नसलेल्या अनधिकृत रिक्षा भाड्याने देण्याचा देखील व्यवसाय मांडला आहे. त्यानुसार शहरात अनधिकृत (बोगस) रिक्षा चालक व मालकांची टोळी सक्रिय झाली आहे. तर राजकीय वरदहस्त लाभत असल्यामुळे त्यांच्याकडून प्रवाशांना तसेच अधिकृत रिक्षाचालकांना वेठीस धरले जात आहे. यासंबंधी काही अधिकृत रिक्षाचालक संघटनांसह प्रवाशांनी देखील आरटीओकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारीनंतर ठरावीक जणांवर कारवाई केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती असते. यामुळे नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर, सारसोळे गाव, घणसोली रेल्वे स्थानकासमोर, सीवूड अशा ठिकाणी अधिकृत - अनधिकृत रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. भविष्यात अनधिकृत रिक्षाचालकांकडून संपूर्ण शहर वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच शहरातील अनधिकृत रिक्षांचे जाळे मोडीत काढण्याची मागणी होत आहे. यापूर्वी पुणे, ठाणे येथे रिक्षाचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. असाच उपक्रम स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्याद्वारे अधिकृत रिक्षाची सहज ओळख पटेल. शिवाय रात्रीच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या प्रवाशाला चालकाविषयीची माहिती सहज उपलब्ध होईल. परंतु शासनाकडून कोणताही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास विरोध करण्याचा रिक्षाचालकांनी पायंडा पाडला आहे. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटर, गणवेश, भाडे दर निश्चितीला रिक्षाचालकांनी विरोध केलेला आहे. त्याद्वारे अनधिकृत रिक्षाचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून साकारलेल्या खारघरमध्ये तर रिक्षाचालकांनी नियमच धाब्यावर बसवले आहेत. आरटीओने निश्चित केलेल्या दरांऐवजी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत आहे. हीच परिस्थिती वाशी, कोपरखैरणे, नेरुळ, सीवूड याठिकाणी पहायला मिळत आहे. शेअर भाडे आकारण्यासाठी मार्ग ठरवून दिलेले असतानाही त्याचे पालन होत नाही. तर एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे येण्याची मागणी केल्यास रिक्षाचालकाकडून दिवसा देखील हाफ रिटर्नच्या बहाण्याने जादा रकमेची मागणी केली जाते.- प्रवाशांची अडवणूक करून रात्री १२ ऐवजी १0 वाजताच प्रवाशांकडून हाफ रिटर्न भाडे आकारणी केली जाते. त्याकरिता मीटरमध्ये बेकायदेशीररीत्या छेडछाड केली जात असल्याचा काहींचा आरोप आहे. यापूर्वी असे काही प्रकार उघडकीस देखील आलेले आहेत.- रिक्षासाठी आवश्यक ठिकाणी थांबे निश्चित करून देण्यात आले आहेत. परंतु बेशिस्त रिक्षाचालकांनी शहरातील सर्व बस थांब्यावरच रिक्षास्टँड तयार केले आहेत. यामुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.- काही रिक्षा थांब्यावर रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या रंगतात. रात्रीच्या वेळी मद्यपान अथवा नशा करून काही जण रिक्षा चालवत असल्याने त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. - शहरातील सर्व विनापरवाना अनधिकृत रिक्षांवर आरटीओकडून कारवाई होणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रवासी वेठीस धरले जात आहेत.