शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

अनधिकृत इमारतीवर हातोडा

By admin | Updated: July 3, 2016 03:26 IST

नेरूळ सेक्टर १६ ए मधील पालिका शाळेच्या जवळील भूखंडावर पालिकेची परवानगी न घेता पाच मजली इमारत बांधण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमारतीवर

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ ए मधील पालिका शाळेच्या जवळील भूखंडावर पालिकेची परवानगी न घेता पाच मजली इमारत बांधण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमारतीवर कारवाई केली. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. शहरातील रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणे हटविल्यानंतर आता शहरातील इतर अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकही अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे ते तत्काळ पाडून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन बांधकाम झाले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर १६ ए मधील महापालिकेच्या शाळेजवळील भूखंडावर परवानगी न घेता पाच मजली इमारत उभी केली होती. नेरूळ विभाग कार्यालयाने संबंधितांना नोटीस दिली होती. यानंतरही बांधकाम सुरू असल्याने पालिकेने इमारतीवर कारवाई केली. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपायुक्त सुभाष इंगळे, साहाय्यक आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, नेरूळ विभाग अधिकारी उत्तम खरात यांच्या पथकाने जेसीबी, काँक्रीट क्रशर मशिनच्या साहाय्याने इमारत पाडली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्यासह ७० पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तासाठी घटनास्थळी तैनात केले होते. महापालिकेने शहरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास येताच त्यांना नोटीस दिल्या जात असून, त्यानंतरही काम सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.