शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतीवर हातोडा; कोपरी गावात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:31 IST

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाची धडक मोहीम

नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, तुर्भे विभागात कोपरी गावात नव्याने अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या एका चारमजली इमारतींवर शुक्रवारी दुपारी कारवाई करण्यात आली.महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी गावातील सेक्टर २६ येथील भूखंड क्र.५० ए, येथे बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली.सध्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष कोरोनाच्या नियंत्रणाकडे लागले आहे. याचाच फायदा घेत, नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांना ऊत आल्याचे चित्र पाहावयास मिळते. सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून गावठाणात नवीन अनधिकृत बांधकामांचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू असल्यामुळे, भूमाफिया आणि विकासक दलालांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी कोपरी गावातील कारवाईसाठी तुर्भे अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधीक्षक अधिकारी पुंडलिक लाटे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त ही कारवाई करण्यात आली. एक जेसीबी, डम्पर, सुरक्षा रक्षक आणि मजूर असा मोठा फौजफाटा होता.तुर्भे विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी मोबाइल बंद ठेवल्यामुळे कारवाई संदर्भात त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.