शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

महामार्गालगतच्या अतिक्र मणांवर हातोडा!

By admin | Updated: October 28, 2015 01:04 IST

मुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत

प्रशांत शेडगे, पनवेलमुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत. इतर विभागाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असून महामार्गावर एकही बांधकाम राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. कळंबोली सर्कलपासून एनएच ४ सुरू होत असून तो पनवेलमधून जातो. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, मात्र काही वर्षांपूर्वी तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या मार्गावर रहदारी जास्त असल्याने पनवेल शहरालगत सतत वाहतूक कोंडी होते. ती फोडण्याकरिता इलेव्हेटेड मार्ग तयार करण्यात आला. मात्र एसटी बस स्थानकासमोरील व्यावसायिक झोपड्यांमुळे काही काम बाकी आहे. याशिवाय आंबेडकर पुतळा ते कोहिनूर टेक्निकल या दरम्यान परिस्थिती फारशी वेगळी नाही. बीएड महाविद्यालय आणि आयटीआयलाही झोपड्यांचा विळखा पडला आहे. या ठिकाणी हॉटेल, गॅरेज, मोबाइल, किराणा दुकान, ट्रॅव्हल्सची कार्यालये थाटण्यात आली आहेत. रस्त्यावरील झोपडीचे कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त वीस हजार भाडे आकारले जात आहे. त्याचबरोबर कळंबोली सर्कल ते खांदा वसाहत सिग्नल या दरम्यान महामार्गालगत जागा अडवून कलिंगडाची दुकाने थाटण्यात आली आहेत. ती गेल्या अनेक वर्षांपासून त्याच जागेवर असून काही मंडळी त्याचे भाडे घेत आहेत. नेत्रज्योत रुग्णालय ते किबा हॉटेल या दरम्यान एका माफियाने स्थानिक असल्याचे भांडवल करून नर्सरी, गॅरेज त्याचबरोबर इतर कारणाकरिता जागा भाड्याने दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर मंदिराच्या नावावर मीटर घेवून सगळ्यांना वीज सुध्दा देण्यात आली आहे. तसेच सिडकोच्या पाइपलाइनला खाजगी पंप लावून पाणी सुध्दा चोरी केले जाते. जुने फर्निचर, याशिवाय इतर दुकाने थाटण्यात आल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. भिंगारी ते पळस्पे ओएनजीसी वसाहतीदरम्यान ही परिस्थिती असून महामार्गालगत कलिंगडापासून कृत्रिम फुले व इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. एक तर या भागात महामार्ग अरुंद आहे आणि दुसरीकडे बाजूला अतिक्र मण करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पनवेल शहरालगतच्या अतिक्र मणाबाबत शिवसेनेचे पालिकेतील गटनेते रमेश गुडेकर यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. मात्र आता रस्ते विकास महामंडळाने या सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या आहेत.