शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तळोजातून वीस लाखाचा गुटखा जप्त एकाला अटक; कर्नाटक मधून आणला जात होता मुंबईत

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 4, 2023 20:13 IST

कर्नाटक येथून मुंबईत आणला जात असलेला २० लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

नवी मुंबई : कर्नाटक येथून मुंबईत आणला जात असलेला २० लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून चौघांवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंब्रा - पनवेल मार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून कक्ष तीन चे वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने रविवारी दुपारी धानसर टोलनाला लगत सापळा रचला होता. यावेळी एक संशयित वर्णनाचा ट्रक नजरेस पडताच पोलिसांनी तो थांबवला. त्यामधील मालाची चौकशी करत असताना त्यात ४८ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सुमारे २० लाख रुपये किमतीचा हा गुटखा या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला.

या गुटख्यासह ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक मोहमद खलील जमाल अहमद शेख याला अटक केली आहे. तो कर्नाटकचा असून सदर गुटखा देखील तो कर्नाटक येथून मुंबईला घेऊन चालला होता. तत्पूर्वीच गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करून तो ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी ट्रक चालक मोहमद याच्यासह ट्रक मालक सय्यद दस्तगीर, फैजल सिद्धीकी व मुन्ना अशा चौघांवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.