शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तालयातील गुन्ह्यांचा वाढतोय आलेख

By admin | Updated: January 9, 2016 02:25 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. तपास लागलेल्या गुन्ह्यांचे श्रेय घेण्यासाठी अधिकारी धडपडत असतात. परंतु प्रलंबित गुन्ह्यांविषयी मात्र कोणीच काही बोलत नाही. आतापर्यंत १३७ खुनाचे गुन्हे व १२,१३४ चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित असून याप्रकरणी पीडित नागरिकांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून २०१५ या वर्षातील कामगिरीची माहिती दिली. गत १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ५४०५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामधील ३६२० गुन्ह्यांचा तपास लागला असून तब्बल १७४८ गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचा हा बॅकलॉग वाढत चालला आहे. पोलिसांच्या वार्षिक अहवालाप्रमाणे २००४ पासून शहरात विविध प्रकारचे ५६,५६५ गुन्हे घडले आहेत. यामधील ३३,५१७ गुन्ह्यांचाच तपास लागला आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ऐरोलीतील काँगे्रसचे नगरसेवक अनंत काळे यांची जवळपास सात वर्षांपूर्वी ऐरोलीमध्ये हत्या झाली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विश्वास पाटील, वाशीतील डेंटिस्ट महिला डॉक्टर, घणसोलीमधील एटीएममधील सुरक्षा रक्षकाचा खून, बेलापूरमधील पारसिक हिलवर विदेशी महिलेवर झालेला बलात्कार या प्रमुख गुन्ह्यांमधील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. खुनाच्या १३७ गुन्ह्यांचा तपास शिल्लक असून त्यांचे आरोपी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी काही टोळ्यांना जेरबंद केले असले तरी प्रत्येक वर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत आहे. प्रत्येक वर्षी जवळपास ८० ते १०० कोटी रुपयांचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी होत आहे. फक्त ३० ते ३५ टक्के चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. घरफोडी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढल्याने महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. चोरी गेलेले दागिने कधी परत मिळणार अशी विचारणा करण्यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु काहीही होत नसल्याचे लक्षात येताच पाठपुरावा करण्याचेही सोडून देत आहेत. १२ वर्षांमध्ये १६१४ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. घर घेण्याच्या व नोकरीच्या आमिषाने अनेकांना फसविले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करून आरोपी खुलेआम फिरत आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेही काही दिवसामध्ये जामिनावर सुटून बिनधास्तपणे समाजात उजळ माथ्याने फिरत असून पीडित नागरिक मात्र न्यायासाठी पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु इतर शहरांप्रमाणे या परिसरातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. २००४ मध्ये ३० महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये ही संख्या १०४ झाली आहे. विनयभंगाचे गुन्हे ३३ वरून २०२ झाले आहेत. या कालावधीमध्ये अतिप्रसंगाच्या २१ गुन्ह्यांचा व विनयभंगाच्या २५ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. याशिवाय सोनसाखळी चोरी व महिलांविषयी इतर गुन्ह्यांचे प्रमाणही प्रचंड असून ते कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर फसवणुकीचे गुन्हे थांबविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घरे घेवून देण्याच्या बहाण्याने बिल्डर नागरिकांची फसवणूक करत आहेत. अनधिकृत इमारती उभ्या करून तेथील घरे अधिकृत असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. १२ वर्षांपूर्वी फसवणुकीच्या १४२ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ही संख्या तीन पटीने वाढून ५६३ झाली आहे. भविष्यात या गुन्ह्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरफोडीचे गुन्हे दुप्पटशहरात रात्री व दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. २००४ मध्ये वर्षभरामध्ये ३१३ गुन्हे घडले होते, ते २०१५ ला ६१९ वर गेले आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घर बंद करून कामावर गेलेल्या नागरिकांना सायंकाळी येण्यापूर्वीच दरवाजा तोडून चोर दागिने व रोकड घेवून पळून जात आहेत. सुटीवर गेलेल्या नागरिकांना परत येईपर्यंत घर सुरक्षित राहील याची खात्री राहिलेली नाही.