शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गट, गणातील अनेकांचा मोर्चा प्रभागाकडे

By admin | Updated: January 4, 2017 05:09 IST

पनवेल शहर महानगरपालिका स्थापन झाल्याने महानगरात ग्रामीण भागाचा समावेश झाला आहे. यामुळे ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. याच कारणाने आता

कळंबोली : पनवेल शहर महानगरपालिका स्थापन झाल्याने महानगरात ग्रामीण भागाचा समावेश झाला आहे. यामुळे ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. याच कारणाने आता गण आणि गटातील लढणारे इच्छुक प्रभागात लढण्याची तयारी करू लागले आहेत. काहींची उमेदवारी जवळपास निश्चित झाली तर काहींचे नेत्यांकडे हेलपाटे वाढवले आहेत. याचा परिणाम ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर जाणवू लागला आहे. तिथे उमेदवारीची शोधाशोध केली जात आहे.पूर्वी पनवेल नगरपरिषद फक्त पनवेल शहर, नवीन नोडपुरती मर्यादित होती. उर्वरित ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होती. खारघरसारख्या सायबर सिटीत राहणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशांना सुध्दा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान करावे लागत होते. एकंदरीत याबाबत शहरी मतदार कमालीचे नाराज होते. त्यांची उदासीनता मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत असे. आता पनवेल महापालिका झाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. तर त्यापेक्षा जास्त उत्साह राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाले असून आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या संपर्ककार्यालयापासून ते विविध कार्यक्र मांची घोडदौड सुरू झाली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे गण आणि गट महापालिकेमुळे कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत काहीशी उदासीनता दिसून येत आहे. पूर्वी नावडे विभागात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली जायची, आता हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्यासह इतर सदस्य महापालिका लढवणार आहेत. तीच परिस्थिती कळंबोली, कामोठे वसाहतीत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम या कळंबोलीतील असल्याने त्या महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती, चंद्रकला शेळके, गोपाळ भगत, प्रमोद भगत, सखाराम पाटील यांचे गण सुध्दा महापालिकेत आले आहेत. त्यामुळे तेही प्रभागवासी झाले आहेत. आत्माराम पाटील यांनी रोडपाली विकास आघाडीची स्थापना केली असून महापालिकेच्या रिंगणात ते उतरणार आहेत.- दोन-अडीच वर्षांपासून पंचायत समितीत सत्ताधारी आणि प्रशासनाला नीलेश पाटील यांनी सळो की पळो करून सोडले. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेल्या त्यांनी मोमीनपाडा येथे जनसंपर्ककार्यालय सुरू केले आहे.