शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मैदानांचे झाले वाहनतळ

By admin | Updated: February 22, 2016 00:32 IST

विकासाकडे झेपावणाऱ्या पनवेल शहरात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. या शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एकीकडे

- वैभव गायकर,  पनवेलविकासाकडे झेपावणाऱ्या पनवेल शहरात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. या शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एकीकडे आकाशही ठेंगणे पडेल अशा गगनचुंबी इमारती तर त्याच ठिकाणी राहणाऱ्या मुलांना मात्र खेळायला मैदानच नाही. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या शहराचा विकास झपाट्याने झाला आहे, मात्र आजही प्राथमिक सुविधांपासून शहर वंचित असल्याने शहराचे नाव मलीन होत आहे. क्रीडा संस्कृती जपण्यासाठी पनवेलमध्ये बांधण्यात आलेल्या मैदानाची सद्यस्थिती पाहता या ठिकाणी साचलेला कचरा, वाहनतळ म्हणून वापरली जाणारी जागा ही वास्तविकता पाहायला मिळते. वर्षातील काही महिने तर खेळाची ही जागा अक्षरश: लग्न समारंभ, मेळावे, राजकीय कार्यक्रमांसाठी वापरली जाते. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली मैदाने, उद्याने मात्र देखभाल, दुरुस्तीअभावी वापराविना पडलेली पाहायला मिळत आहे. सुटीच्या दिवशी मुले रस्त्यावर, गल्लीत जिथे जागा मिळेल तिथे रेल्वे स्थानक परिसरातही खेळताना पाहायला मिळतात. शहराचा वाढत चाललेला विस्तार लक्षात घेता खेळाच्या मैदानांकडे मात्र गांभीर्याने लक्षच घातले जात नाही.विशेष म्हणजे शहरात गल्लीबोळात देखील वाहनांची वर्दळ असल्याने मुलांना शहराबाहेर खेळण्यासाठी जावे लागत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची गरज आहे. पनवेल नगरपरिषदेची महानगर पालिकेकडे वाटचाल सुरु आहे. मात्र सर्वच बाबतीत प्रशासन फेल ठरले असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. शहरात मैदानी खेळ खेळण्यासारखे केवळ एक मैदान आहे. पनवेलच्या लोकसंख्येच्या दृष्टीने मैदानांची संख्या जास्त हवी होती. प्रशासनाकडे देखील याबाबत इच्छाशक्ती नसल्याचे, न्यू बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव आशुतोष भिसे यांनी सांगितले. आम्ही सिटीझन युनिट फोरमच्या वतीने अशोक बागेसमोरील मैदानासाठी राखीव असलेले भूखंड विकसित करण्याची मागणी करीत आहोत. मात्र तरी देखील याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा एकूण आराखडा पाहिला असता नगरपरिषदेकडे जागाच शिल्लक नसल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.