शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन व्यवहारांत घोळ

By admin | Updated: September 16, 2014 22:40 IST

फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या रायगड जिल्हय़ाच्या महसूल विभागातील तब्बल 21 अधिकारी व कर्मचा:यांच्या विभागीय चौकशा सुरू आहेत.

जयंत धुळप ल्ल अलिबाग
शासकीय सेवेत लोकसेवक या नात्याने काम करीत असताना आपल्याला प्राप्त अधिकारांचा गैरवापर करुन बेकायदा कृती केल्या प्रकरणी जिल्हय़ातील विविध पोलीस ठाण्यात रीतसर फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या रायगड जिल्हय़ाच्या महसूल विभागातील तब्बल 21 अधिकारी व कर्मचा:यांच्या विभागीय चौकशा सुरू आहेत. 
या 21 मध्ये प्रथम वर्ग अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्य़ात सापडलेले कजर्तचे तत्कालीन तहसीलदार युवराज बांगर, द्वितीय वर्ग अधिकारी कजर्तचे नायब तहसीलदार रवींद्र कुंटे, अन्य एक द्वितीय वर्ग अधिकारी यांच्यासह महसूल विभागातील 18 तलाठी व महसूल मंडळ अधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अजित नैराळे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
मुंबईतील भांडुप येथील भिकाजी धाकू राजम यांनी कजर्त तालुक्यातील निकोप गावातील हरिश्चंद्र लक्ष्मण झांजे यांच्याकडून 2 फेब्रुवारी 1989 रोजी खरेदी दस्त क्र.412/1989 अन्वये जमीन खरेदी केली होती. परंतु त्यावेळी सातबारा उता:यावर भिकाजी धाकू राजम यांचे नाव नोंदविण्याचे राहून गेले होते. 
याच त्रुटीचा नेमका गैरफायदा घेवून हरिश्चंद्र लक्ष्मण झांजे व दशरथ चंद्रकांत भगत (रा.चिंचवली-कजर्त) यांनी संगनमत करुन मुंबईतीलच माहिम येथील उषा अशोक जोहरी व अशोक जोहरी यांच्याशी खोटे खरेदीखत करुन विक्री केली. 
या प्रकरणी मूळ मालक भिकाजी धाकू राजम यांनी कजर्त न्यायालयात दावा दाखल केल्यावर सुनावणी अंती न्यायालयाने कजर्त पोलिसांना दिलेल्या आदेशान्वये हरिश्चंद्र लक्ष्मण झांजे, दशरथ चंद्रकांत भगत (रा.चिंचवली-कजर्त), उषा अशोक जोहरी व अशोक जोहरी यांच्यासह कजर्तचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला 
आहे.
 
महसूल तलाठय़ासह 
पाच जणांवर गुन्हा 
4खोटय़ा अखत्यारपत्रद्वारे मूळ जमीन मालक 1क् असताना त्यातील पाच जणांना वगळून माणगांवमधील ही जमीन पाच जणांच्या नावे करुन खोटा सातबारा आणि खोटे सरकारी फेरफार करुन फसवणूक केल्या प्रकरणी खालापूर तालुक्यातील हाळबुद्रुक गावातील शफिक अहमद जळगांवकर यांची फसवणूक केल्या प्रकरणी माणगाव तालुक्यातील पहेल गावचा तलाठी आर.व्ही.महाले यांच्यासह संदेश रामचंद्र नागे (रा.साजगांव-खालापूर), दिलीप खाशाबा भोसले, रघुनाथ येटू उभारे व हरिदास रामचंद्र उभारे (सर्व रा.माणगांव) यांच्या विरुद्ध गोरेगांव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
असा होतो बेकायदा जमीन विक्री व्यवहार
4नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जिल्हय़ाबाहेर असणा:या जिल्हय़ातील शेतकरी व ग्रामस्थ यांना हेरुन त्यांच्या शेतजमिनी महसूल यंत्रणोतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संधान साधून, बनावट मालक, त्या बनावट जमीन मालकाचे बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे आहेत असे भासवून, जमिनींची परस्पर बेकायदा विक्री केली जाते. त्यातून मूळ शेतजमीन मालक आणि जमीन खरेदीदार या दोघांचीही फसवणूक होते. असे हे बेकायदा उद्योग गेल्या दोन-चार वर्षात जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात फोफावले आहेत. 
असा दाखल होतो पोलिसांत गुन्हा 
4फसवणूक होवून आपली शेतजमीन बेकायदा विक्री झाल्याप्रकरणी मूळ मालक तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करतात. परंतु या प्रकरणांचा महिनोंमहिने निर्णय होत नाही. या तक्रारी पोलीस ठाण्यात देखील दाखल करुन घेतल्या जात नाही. अखेर पीडित शेतकरी व ग्रामस्थ न्यायालयात दिवाणी दावा दाखल करतात. 
 
वस्तुस्थिती समोर आल्यावर अखेर फौजदारी गुन्हे
4न्यायालयांत या प्रकरणांची सुनावणी होवून, त्यातली वस्तुस्थिती समोर आल्यावर अखेर न्यायालयच या फसवणुकींच्या प्रकरणांत पोलिसांना रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करुन तपास करण्याचे आादेश देते. आणि महसूल यंत्रणोतील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह बनावट जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणा:यांवर देखील गुन्हा दाखल होतो.