शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन कॉरिडोअर निरुपयोगी

By admin | Updated: April 9, 2017 03:01 IST

टोलनाक्याच्या रांगेत रुग्णवाहिकेची अडवणूक होऊ नये, यासाठी वाशी टोलनाक्यावर ग्रीन कॉरिडोअर सुरू करण्यात आले होते; परंतु अनेक दिवसांपासून ही यंत्रणा कोलमडली

नवी मुंबई : टोलनाक्याच्या रांगेत रुग्णवाहिकेची अडवणूक होऊ नये, यासाठी वाशी टोलनाक्यावर ग्रीन कॉरिडोअर सुरू करण्यात आले होते; परंतु अनेक दिवसांपासून ही यंत्रणा कोलमडली असल्याने रुग्णवाहिकांनाही टोलच्या रांगेतून जावे लागत आहे. याचा नाहक त्रास रुग्णांना होत असून टोल कर्मचाऱ्यांकडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने वाशी टोलनाक्यावर ‘ग्रीन कॉरिडोअर’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली होती. ३० आॅगस्ट २०१५ रोजी या ग्रीन कॉरिडोअरचे मोठ्या थाटात उद्घाटनही करण्यात आले होते. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची टोलनाक्यावरील रांगेत अडवणूक होऊ नये, याकरिता हे ग्रीन कॉरिडोअर वापरण्यात येत होते. त्याकरिता टोलच्या दोन्ही दिशेला एका लेनवर विशेष यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. एखादी रुग्णवाहिका जात असल्यास तिला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी कामगार तैनात करण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने ही यंत्रणा योग्यरीत्या राबवली गेली; परंतु सध्या ही यंत्रणा कोलमडली असून रुग्णवाहिकेसाठी ती निरुपयोगी ठरत आहे. ग्रीन कॉरिडोअरच्या ठिकाणी नेमलेले कर्मचारीच जागेवर उपस्थित नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होत नाही. परिणामी, टोल भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगेतूनच रुग्णवाहिकेलाही जावे लागत आहे. याचा नाहक त्रास रुग्णाला व रुग्णासोबतच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. टोलनाक्याच्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप प्रदीप बुरकूल यांनी व्यक्त केला आहे. ग्रीन कॉरिडोअर ही संकल्पना योग्यरीत्या राबवली जाणे गरजेचे असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यामुळे टोलच्या रांगेत रुग्णवाहिका अडकल्याने उपचारास विलंब होऊन एखादा रुग्ण दगावल्यास त्याला टोल कंपनी जबाबदार असेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)