शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या प्रत्येक कामावर करडी नजर, २५०० कामांची संगणकीय यादी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:37 IST

शहरात सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या व भविष्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक कामावर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. अनावश्यक खर्चावर निर्बंध घातले आहेत. प्रत्येक प्रस्तावास मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी भेट देण्यास सुरवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : शहरात सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या व भविष्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक कामावर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. अनावश्यक खर्चावर निर्बंध घातले आहेत. प्रत्येक प्रस्तावास मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी भेट देण्यास सुरवात केली आहे. विकासकामे वेळेत व्हावी यासाठी २५०० कामांची संगणकीय यादी तयार केली असून, नियमितपणे त्यांचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.घणसोली सेक्टर ७ मधील महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. वृत्त वाचताच आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शाळेला अचानक भेट दिली. शाळा दोन सत्रामध्ये सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली. शिक्षक वेळेत येवू लागले व खासगी संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले आहे. आयुक्तांनी एका शाळेच्या प्रश्नाचीही दखल घेतल्यामुळे पालकांसह शिक्षकांनीही कौतुक केले होते. घणसोली शाळेप्रमाणेच शहरातील इतर प्रश्न व विकासकामे आयुक्तांनी याच पद्धतीने मार्गी लावण्यास सुरवात केली आहे. पदभार स्वीकारल्यापासून आलेला प्रत्येक प्रस्ताव तपासला जात आहे. प्रस्तावांना मंजुरी देण्यापूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली जात आहे. आतापर्यंत सर्व १११ प्रभागांना भेटी देऊन तेथील परिस्थिती समजून घेतली आहे. कोणालाही माहिती न देता संबंधित अभियंते व आवश्यक अधिकाºयांना घेऊन घटनास्थळी पाहणी केली जाते. कामांची गरज असल्यास त्याच ठिकाणी फाईलवर सही केली जात आहे. कामाची आवश्यकता नाही असे सांगितल्यास तत्काळ नकार दिला जात आहे.फक्त पैसे खर्च करण्यासाठी कामे काढू नका. शहरवासीयांना आवश्यकता असेल त्याच कामांचे नियोजन करा अशा सूचनाही अधिकाºयांना दिल्या आहेत. शहरात प्रत्यक्ष सुरू असलेल्या व करण्यात येणाºया २५०० कामांची यादी तयार करण्यात आली आहे. संगणकावर सर्व प्रस्ताव, त्यांचा कार्यादेश, निविदा प्रक्रियेपासून काम कोणत्या स्थितीमध्ये आहे याची नोंद ठेवण्यात आली आहे. शहर अभियंता व संबंधित अधिकाºयांकडून प्रत्येक आठवड्याला या कामांचा आढावा घेतला जात असून त्यांच्यानंतर सर्व कामांवर स्वत: आयुक्त लक्ष देत आहेत. जी कामे सुरू आहेत ती वेळेत व चांगल्या दर्जाची होवू द्या. कामे वेळेतच झाली पाहिलेत. विलंब झाल्यास त्याविषयी योग्य स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. विलंब करणाºया ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. आयुक्त अचानक कार्यालयास भेट देत असल्यामुळे अधिकारीही सतर्क झाले आहेत.प्रत्येक कार्यालयास भेटआयुक्तांनी महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयांना अचानक भेट देण्यास सुरवात केली आहे. नुकतीच परिवहनच्या मुख्यालयास भेट देवून तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. कामकाज सुधारा नाहीतर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. याच धर्तीवर इतर कार्यालयांना भेटी दिल्या जात आहे. सर्वांना संधी दिली असून भविष्यात कामात हलगर्जी आढळल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.२ हजार कोटींच्या ठेवीमहापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून सद्यस्थितीमध्ये २ हजार कोटी रूपयांच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जनतेच्या पैशाचा योग्य वापर केला पाहिजे. फक्त पैसे खर्च करण्यासाठी कामे केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.योग्य कामांचे स्वागतप्रशासनाने लोकप्रतिनिधींसह सर्वांचाच योग्य आदर करण्यास सुरवात केली आहे. योग्य कामांना तत्काळ मंजूरी दिली जाणार पण अनावश्यक कामे कोणत्याही स्थितीमध्ये न करण्याचे धोरण अंगिकारले असून आदर करताना दबावाखाली कामे केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आयुक्तांच्या कार्यशैलीवर एक गट नाराजआयुक्तांच्या प्रत्येक कामाची घटनास्थळी जावून पाहणी करण्याच्या धोरणावर लोकप्रतिनिधी व प्रशासनातीलही एक गट नाराज आहे. आयुक्तांचा इतर अधिकाºयांवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी जाण्यामुळे वेळ वाया जात असल्याचीही टीका होवू लागली आहे. विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचा आरोपही होवू लागला आहे. परंतु आयुक्तांनी मात्र याकडे दुर्लक्ष करून कामांची स्वत: खात्री करून घेण्याचेच धोरण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई