शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलीच्या विवाहाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार, स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:31 IST

नवी मुंबई : अनाथ मुलीच्या व आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलेच्या पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.

नवी मुंबई : अनाथ मुलीच्या व आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलेच्या पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणा-यांना अनुक्रमे ५० व ३० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत एकूण २७ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पालिकेच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेने अनाथ मुली व विधवा महिलांच्या पुनर्विवाहास अर्थसाहाय्य देण्याची योजना सुरू केली आहे. यापूर्वी ३५ हजार रूपये अनुदान दिले जात होते. यामध्ये वाढ करून ५० हजार रूपये करण्यात येणार आहे. अर्थार्जन करणारा कुटुंब प्रमुख मृत्यू पावल्यामुळे विधवा महिलांवर चरितार्थाचा प्रश्न निर्माण होत असतो. पुनर्विवाह केल्यास अशा महिलांचे पुढील आयुष्य सुरक्षित होते यामुळे महापालिकेने अनुदान सुरू केले आहे. याशिवाय अनाथ मुलींचे लग्न करताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महापालिकेने ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठीही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचण्या करणाºयांवरही कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय १ किंवा २ मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबाला प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. १ मुलीवर शस्त्रक्रिया करणाºयांना ५० हजार रूपये व २ मुलींवर शस्त्रक्रिया करणाºयांना ३० हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.