शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना थकीत मालमत्ता कर लवकरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:32 IST

उरण तालुक्यातील महालण विभागातील जसखार, सोनारी, करळ, फुंडे, नवघर, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा, धुतूम, जासई, चिर्ले आदी ११ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमिनी सिडकोने जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित केल्या.

उरण : न्यायालयात मालमत्ता कराच्या संबंधित असलेले दावे मागे घेण्यात आल्यानंतरच उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना मालमत्ता कराचे वाटप करण्यात येणार आहे. मालमत्ता कराच्या वसुलीबाबत मंगळवारी (६) ग्रामपंचायतीच्या जेएनपीटी बंदराचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आश्वासन दिले आहे.उरण तालुक्यातील महालण विभागातील जसखार, सोनारी, करळ, फुंडे, नवघर, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा, धुतूम, जासई, चिर्ले आदी ११ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमिनी सिडकोने जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित केल्या. मात्र, १९८४ पासून या ग्रामपंचायतींना देण्यात येणारा सुमारे १०० कोटींचा रुपयांचा मालमत्ता कर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे विशेष ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागले होते.यावेळी प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटीकडे थकीत असलेला मालमत्ता कराची रक्कम मिळावी, यासाठी उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, मंत्रालय, न्यायालयात टप्प्याटप्प्यांनी धाव घेतली होती. मात्र, त्यानंतरही फैसला झाला नसल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. मात्र, त्यानंतर मालमत्ता कराची रक्कम न्यायालयातील दाव्यामुळे प्रलंबित राहिल्याने, जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीना मालमत्ता कराची रक्कम प्राप्त होऊ शकली नाही. यामुळे या ग्रामपंचायतींचा विकास खुंटला असून, अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मालमत्ता कराची रक्कम मिळावी, यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मंगळवारी(६) बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जेएनपीटी बंदराचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ अधिकारी जयवंत ढवळे, मनिषा जाधव, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, सोनारी सरपंच पूनम कडू, माजी सरपंच महेश कडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.काही ग्रामपंचायतींनी न्यायालयातील प्रलंबित दावा मागे घेण्यासंदर्भात होकार दर्शविला आहे. न्यायालयात मालमत्ता कराच्या संबंधित असलेले दावे मागे घेण्यात आल्यानंतर, मालमत्ता कराची रक्कम अदा करण्याचे आश्वासन उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिले आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटी