शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत

By admin | Updated: August 5, 2015 00:17 IST

तालुक्यातील १५ ग्रामपंचायातच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. ३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश होता.

पनवेल : तालुक्यातील १५ ग्रामपंचायातच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. ३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश होता. ९४ टक्के मतदान झाले असून गुरु वारी या निवडणुकाचे निकाल जाहीर होणार आहेत. हरीग्राम, पाली देवद, केवाळे, उसर्ली खुर्द, तरघर, वलप, खैरवाडी, उमरोली, पाले बुद्रुक, पिसार्वे, आकुर्ली, आपटे, वारादोली, खाणाव, देवलोळी आदींसह गव्हाण, उलवे, जांभिवली या तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका यावेळी पार पडल्या. पनवेल मधील ग्रामीण भागात शेकापची ताकद मोठी असल्याचे बोलले जाते. यापैकी अनेक ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा अनेक वर्षांपासून फडकत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शेकापच्या बाळाराम पाटील यांना ग्रामीण भागातून चांगले मताधीक्य मिळाले होते. पूर्वीचे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ग्रामीण भागात भाजपाला ‘अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी शेकाप विरुद्ध भाजपा अशी लढत रंगली असून काँग्रेसने शेकाप सोबत युती केली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे देखील वर्चस्व असल्याने अनेक ठिकाणी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे मतदान केले आहे. कुठेही निवडणुकांना गालबोट लागले नसून सर्वत्र निवडणुका शांततेत पार पडल्या.