शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचा गृहप्रकल्प शासनाने रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:50 IST

नवी मुंबईच्या महापौरांची मागणी : सार्वजनिक सुविधांवर ताण येण्याची शक्यता

नवी मुंबई : एपीएमसीजवळील ट्रक टर्मिनल व रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या जागांवर प्रस्तावित गृहप्रकल्प शासनाने रद्द करावा. या प्रकल्पांमुळे पार्किंगसह इतर सार्वजनिक सुविधांवर ताण वाढण्याची शक्यता महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केली आहे. याविषयी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून यावर लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये एक लाख घरांचे बांधकाम करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. रेल्वे स्टेशन, ट्रक टर्मिनल व बस टर्मिनलच्या भूखंडांवर हे प्रकल्प उभारण्यात येणार असल्यामुळे त्याला विरोध होऊ लागला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी सर्वप्रथम याला विरोध दर्शविला आहे. प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर तत्काळ याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. रेल्वे स्टेशन व ट्रक टर्मिनलमधील प्रकल्पामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. रेल्वे स्टेशनसमोर वाहतूककोंडी वाढेल, अशी शक्यताही व्यक्त केली होती. राज्यात काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना नवीन सरकारने शहरहिताच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी. शहराचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. नवी मुंबईमध्ये सार्वजनिक वापराच्या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे शहराचे नुकसानच होणार असून तो प्रकल्प विद्यमान सरकारने रद्द करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. महापौरांच्या भूमिकेमुळे सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबईमध्ये एपीएमसीजवळ असलेल्या एकमेव ट्रक टर्मिनलच्या जागेवरही गृहप्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, ट्रक टर्मिनलची जागा अवजड वाहने उभी करण्यासाठीही कमी पडू लागली आहे. जागा नसल्यामुळे एपीएमसी परिसरातील सर्व रोडवर अवजड वाहने उभी करावी लागत आहेत. या ठिकाणी गृहप्रकल्प उभारल्यास पार्किंगचा प्रश्न अजून गंभीर होण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रकल्प नको, अशी भूमिका नागरिकांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली आहे. सीवूड रेल्वे स्टेशनच्या जागेवर सिडकोने व्यावसायिक संकुल उभे केले आहे. यामुळे सीवूड रेल्वे स्टेशनसमोर वारंवार वाहतूककोंडी निर्माण होऊ लागली आहे. पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरामध्ये ध्वनिप्रदूषणही वाढले आहे. सिडको सानपाडा व जुईनगर रेल्वे स्टेशनच्या समोरही गृहप्रकल्प उभारणार आहे. तो प्रकल्प उभा राहिला तर या परिसरामध्येही वाहतूककोंडी, पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार आहे.शहरवासीयांवर परिणामसिडकोने एपीएमसीजवळील ट्रक टर्मिनल, सानपाडा व जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारल्यास त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागणार आहेत.रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूककोंडी गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध नाही; पण तो रेल्वे स्टेशनसमोरील सार्वजनिक वापराच्या जागेवर उभारण्यास विरोध असल्याचे मत शहरवासी व्यक्त करू लागले आहेत.बहुमजली वाहनतळ असावेरेल्वे स्टेशन व ट्रक टर्मिनलची जागा वाहनतळांसाठीच आरक्षित असावी. शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे या जागांवर गृहनिर्माण प्रकल्पांऐवजी बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे. बहुमजली वाहनतळ उभे राहिले तर त्याचा लाभ शहरवासीयांना होईल, असे मतही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.