शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१०८५ पदांना सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:21 IST

पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरभरती करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह महापौर व प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता

नवी मुंबई : पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरभरती करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह महापौर व प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. रखडलेल्या या आकृतीबंदास सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या विभागात १०८५ नवीन पदे भरण्यात येणार असून त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा गत एक वर्षापासून पूर्णपणे कोलमडली होती. बांधकाम पूर्ण झालेली तीन रूग्णालये प्रत्यक्षात सुरू झाली नाहीत. कोपरखैरणे व तुर्भे माताबाल रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने बंद आहे. प्रथम संदर्भ रूग्णालय व नागरी आरोग्य केंद्रामधूनच शहरवासीयांना वैद्यकीय सुविधा दिल्या जात होत्या. जवळपास दहा वर्षांपासून या विभागातील डॉक्टर ते शिपाई संवर्गातील अनेक पदे रिक्त होती. पालिका प्रशासनाने आरोग्य विभागातील नोकरभरतीसाठी आकृतीबंद तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी नवीन १०८५ पदांना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे पत्र सरकारकडे पाठविले होते. १७ जुलै २०१५ मध्ये सविस्तर आकृतीबंद शासनाकडे सादर केला होता. आरोग्य विभागात पुरेसे कर्मचारी नसल्याने कोट्यवधींचा खर्च करून बांधलेली तीन नवीन रूग्णालये सुरू करता आली नाहीत. अत्याधुनिक फॅक रूग्णवाहिकाही धूळ खात आहेत. शहरातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुरळीत व्हावी यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, सत्ताधारी पक्षाचे नेते व प्रशासनानेही पाठपुरावा केला होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी व शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून कर्मचारी भरतीच्या आकृतीबंदास मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार १०८५ पदांच्या आकृतीबंदास मंजुरी देण्यात आलीअसून अध्यादेशही काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)> आरोग्य विभागात कर्मचारी भरतीचा प्रश्न दहा वर्षे प्रलंबित होता. महापालिकेने सविस्तर आकृतीबंद जुलैमध्ये शासनाकडे पाठविला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना शहरातील आरोग्य यंत्रणेविषयी माहिती दिली. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळविण्यासाठी सरकारने तत्काळ आकृतीबंदास मान्यता दिली असून यामुळे पालिकेची आरोग्ययंत्रणा सक्षम होणार आहे. - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदार संघ > आरोग्य विभागामध्ये रिक्त असणारी पदे भरण्यासाठी सविस्तर आकृतीबंद शासनाकडे पाठविला होता. गतवर्षभर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे आरोग्ययंत्रणा सक्षम होवून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देता येणार आहेत. - दिनेश वाघमारे, आयुक्त, महापालिका