शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एपीएमसी’तील ‘सेस’ वसुलीत गुंडांचा हस्तक्षेप, कर्मचाऱ्यांना दिली जाते धमकी, सेस चोरणारे रॅकेट सक्रिय

By नामदेव मोरे | Updated: April 4, 2025 12:44 IST

Navi Mumbai: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत. मार्केटमध्ये दहशतीचे वातावरण झाले असून, ही गुंडगिरी कोण मोडून काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

फळमार्केटमध्ये २३ वर्षांपासून थेट गेटवर बाजार फी वसूल करण्यात येत आहे. वाहतूकदार व खरेदीदार पूर्ण कर भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीच्या अहवालामध्येही महसुलाचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक नवीन प्रकार निदर्शनास येत आहेत. 

शिवीगाळ, मारहाणवाहनांमधील सर्व फळांचा कर भरला जात नाही. हे बाजार समितीच्या कारवाईतूनही स्पष्ट झाले आहे. वाहने कर न भरता सोडण्यासाठी गेटवरील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातो. त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली जाते. 

कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. कोणी धमकी देत असेल, गुंडगिरी करत असल्यास निदर्शनास आणून दिल्यास त्यांच्यावर कारवाई करता येईल. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट 

भीतीमुळे तक्रार नाही फळमार्केटच्या गेटवर काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी वाहने अडविल्यामुळे त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. दहशत व गुंडगिरीमुळे कर्मचारीही दबावामध्ये असून, भीतीमुळे कोणी तक्रार करत नाही.  

काय आहे व्हिडीओत... गेटवरील काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ बाजार समितीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाईट भाषेत शिवीगाळ करत आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आवाज येत आहे. एपीएमसीचा कर्मचारी  फोन करून साहेब सुरज्या आई-बहिणीवरून शिव्या देत असल्याची माहिती कोणाला तरी देत असल्याचे पाहावयास मिळते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMumbaiमुंबई