शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वोटर्स स्लिपवर गुगल लोकेशन; मतदान केंद्र शोधण्यासाठी होणार मतदारांना मदत

By वैभव गायकर | Updated: May 1, 2024 15:52 IST

पनवेल विधानसभा क्षेत्रात 530 बीएलवो मार्फत घरोघरी जाऊन मतदान स्लिप (वोटरस्लिप) वितरित करण्यात येणार आहे. 

पनवेल : लोकसभा निवडणूक हा भारतातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणून संबोधले जाते. देशाचे भवितव्य या निवडणुकीच्या मतदानातून ठरत असते. याच दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दृष्टीने स्वीप कार्यक्रम राबवत मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. पनवेल मध्ये 544 मतदान केंद्र आहेत. पनवेल विधानसभा क्षेत्रात 530 बीएलवो मार्फत घरोघरी जाऊन मतदान स्लिप (वोटरस्लिप) वितरित करण्यात येणार आहे. 

या स्लिपवर मतदाराचे नाव, मतदानाची तारीख, केंद्राचे नाव आणि विशेष म्हणजे मतदान केंद्राचे गुगल लोकेशन असणार आहे. गुगल लोकेशनद्वारे मतदारांना थेट मतदार केंद्रावर पोहचणे शक्य होणार आहे. प्रथमच हा प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देखील हायटेक पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवत आहे.पनवेल मध्ये 5 लाख 91 हजारांच्या आसपास मतदार आहेत. या सर्व मतदारांना घरपोच वोटर स्लिप पोच केली जाणार आहे. मतदानाच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी या सर्व वोटर स्लिप मतदारांपर्यंत पोच झालेल्या असतील, अशी माहिती पनवेलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. 

मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोग जनजागृती करीत आहे. बॅनर्स होर्डिंग्सद्वारे मतदान करण्याचे अवाहन केले जात आहे.भारतरत्न मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे लागलेले बॅनर्स पनवेल मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पनवेल मध्ये 544 मतदान केंद्रांपैकी 332 क्रमांकाचा मतदान केंद्राची दुरा महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असणार आहे.पनवेल शहरातील वाजेकर स्कुल मधील  या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

शहरात राहणाऱ्या मतदारांना मुख्यत्वे करून मतदान केंद्र शोधण्यासाठी अडचणी येत असतात. आपण राहत असलेल्या परिसरापेक्षा इतरत्र मतदान केंद्र आपल्यास ते शोधन्यास काही वेळा कसरत करावी लागते. यावर्षी गुगल लोकेशन वोटर स्लिपवर असल्याने सहजरित्या मतदान केंद्रावर पोहचणे शक्य होणार आहे.

गुगल लोकेशनचा अंतर्भाव वोटर स्लिप वर करण्यात आला आहे.यामुळे मतदार केंद्रावर पोहचणे मतदाराना सहजरीत्या शक्य होणार आहे.- राहुल मुंडके (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,पनवेल)

टॅग्स :panvelपनवेल