शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर

By कमलाकर कांबळे | Updated: September 24, 2024 08:00 IST

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर राबवणार २५ हजार घरांची बंपर विक्री योजना

नवी मुंबई :  ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दसऱ्याआधी २५ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर ही घरे उपलब्ध होतील. त्यांच्या किमतीही बाजारभावापेक्षा कमी असतील, अशी माहिती सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी ‘लोकमत’ला दिली.

अल्प उत्पन्न घटकांना लाभ 

शहराच्या विविध भागांतील  २७ ठिकाणी ही  ६७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहेत. त्यापैकी  पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून  त्यांचे बांधकामही  प्रगतिपथावर आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात यातील २५ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याची योजना आहे. यातील बहुतांशी घरे  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असणार आहेत, असे विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.

कुठल्या घरांचा होणार समावेश?

दरम्यान, सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाठ हे मंगळवारी विविध भागातील  गृहप्रकल्पांच्या कामांची पाहणी करणार आहेत. प्रस्तावित योजनेत कोणत्या विभागातील घरांचा समावेश करायचा याचा आढावा घेणार आहेत.

त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम आराखडा तयार करून योजना जाहीर केली जाईल. या योजनेत तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी येथील घरांचा  समावेश असण्याची शक्यता आहे.

मार्केटिंग कंपनीचे भवितव्य अधांतरी?

घरांचे मार्केटिंग आणि विक्री करण्यासाठी  सिडकोने नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेचा  वाद मागील दीड वर्षापासून नगरविकास विभागाकडे निवाड्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नवीन गृहयोजना जाहीर करताना सिडकोची कोंडी होत आहे. 

मात्र, आता अधिक प्रतीक्षा न करता या घरांच्या विक्रीसाठी ‘बुक माय सिडको होम’ अर्थात ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेचा अवलंब करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 

याअंतर्गत ग्राहकांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. याअंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको