शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हळदीला आले सोनेरी दिवस, बाजारभाव तेजीत; हळदउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By नामदेव मोरे | Updated: March 3, 2024 13:29 IST

यावर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई : यावर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 मिर्ची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते. परंतु हळदीला अपेक्षीत दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले होते.गत हंगामामध्ये अपेक्षीत लाभ न झाल्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. गत वर्षी मुंबई बाजार समितीमध्ये हळद प्रतीकिलो ९० ते १३० रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी हे च दर १५० ते २०० रुपये किलोवर पोहचले आहेत. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन ३० ते ५० टन हळदीची विक्री होत आहे.         उन्हाळ्यामध्ये लग्नसराई, चटणी तयार करणे यासाठी हळद व हळकुंडांना मागणी वाढते. यामुळे पुढील दोन महिने हळदीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई बाहेरील बाजारपेठांमध्येही हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी हळदीचे दर कमी होते. यावर्षी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अमरीश बरोत, व्यापारी मसाला मार्केट

जगातील सर्वाधीक हळद उत्पादन भारतातजगातील सर्वात जास्त हळदीचे उत्पादन भारतामध्ये होते. २०२२ - २३ मध्ये ३.२४ लाख हेक्टरवर हळद लागवड केली होती. ११.६१ लाख टन हळदीचे उत्पादन झाले होते. जगातील उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के उत्पादन फक्त भारतामध्ये होते. युएई, युएसए, मलेशिया, बांगलादेश व इतर देशात निर्यात केली जाते. देशात ३० पेक्षा जास्त जातीच्या हळदीची लागवड केली जाते.

तामिळनाडूसह महाराष्ट्राची आघाडीदेशात तामिळनाडू व महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधीक उत्पादन होते. तेलंगणा, कर्नाटमध्येही मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते. महाराष्ट्रात सातारा, सांगली, हिंगोली परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

औषधी गुणधर्म

हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ग्राहकांकडून आहारामध्येही हळदीला नेहमी प्राधान्य दिले जाते. औषध, सौंदर्य प्रसाधनामध्येही हळदीचा उपयोग केला जातो. धार्मीक कार्यक्रम व लग्नकार्यातही हळदीचा वापर होत असतो.