शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील जांभळांची मुंबईवारी

By admin | Updated: April 23, 2017 02:21 IST

जांभळाचा मोसम सुरू झाल्याने आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज एक टन जांभूळ विक्रीसाठी येऊ लागले आहेत. गोव्यातून जांभळाची मोठ्या

- नामदेव मोरे, नवी मुंबई

जांभळाचा मोसम सुरू झाल्याने आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज एक टन जांभूळ विक्रीसाठी येऊ लागले आहेत. गोव्यातून जांभळाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. घाऊक बाजारात ६० ते ८० व किरकोळ बाजारात १०० ते १२५ रुपये किलो दराने जांभूळ विकले जात आहे. महाराष्ट्रात दुर्लक्षित असलेल्या व गांभीर्याने शेती म्हणून लक्ष न दिलेल्या फळांमध्ये जांभळाचा सहभाग होतो. एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील छोट्या शहरांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी जांभूळ विक्रीसाठी घेऊन येतात. पाच ते दहा रुपयांना एक पेला या दरानेच त्याची विक्री होते. परंतु, आता या फळामधील औषधी गुणांविषयी जागृती होऊ लागल्याने मुंबई व इतर महानगरांमध्ये जांभळाची मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत रोज किमान एक टन माल गोव्याहून विक्रीसाठी येत आहे. याशिवाय मुंबईमध्ये भायखळा व इतर ठिकाणी थेट विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जांभूळ जात आहेत. १५ दिवसांनंतर बदलापूर, नाशिक, सांगली, सातारा व कोकणातूनही जांभूळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. एपीएमसीमध्ये मोठ्या आकाराची जांभळे ८० रुपये व लहान आकाराची ६० व ७० रुपये किलोलो विकली जात आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर १०० ते १२५ रुपये किलो आहेत. मधुमेहावर ते गुणकारी आहे. हा आजार झालेले जांभूळ खातातच, शिवाय त्याच्या बिया सुकवून त्याची भुकटी करून वर्षभर तिचे प्राशन करत असतात. याशिवाय अनेक आजारांवर ते उपयोगी असल्यानेही मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)आरोग्यदायी जांभळे : जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहावर गुणकारी आहे. जांभळाचा गर व रस रक्तक्षय, हिमोग्लोबीन, अरुची, भूकवर्धक, त्वचारोग व इतर आजारांसाठी उपयोगी आहे. तसेच उच्च रक्तदाब, यकृताशी संबंधित आजारावरही जांभूळ गुणकारी आहे.मुंबई बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत रोज सरासरी एक टन जांभूळ विक्रीसाठी येत आहेत. ६० ते ८० रुपये किलो दराने होलसेलमध्ये विक्री होत असून बहुतांश माल गोवा येथून येत आहे. पुढील १५ दिवसांमध्ये बदलापूर, नाशिक, सांगली व इतर ठिकाणावरून जांभूळ विक्रीसाठी येईल. - संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी