शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्या

By admin | Updated: April 19, 2017 00:55 IST

सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे.

नवी मुंबई : सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे. पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवू नये, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये डिसेंबर २००० पर्यंत शहरात ४१ हजार ५०५ झोपड्या असल्याचे निदर्शनास आले आहे. झोपडीधारकांना वैयक्तिक नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला होता. प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर टीका केली. २०१५ पर्यंतची घरे कायम करण्यासाठी आंदोलन करता व २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सादर करणे चुकीचे आहे. वीज व पाण्याशिवाय शहरात कोणीही राहू शकत नाही. वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरण मागेल त्याला वीज देते. त्याच धर्तीवर पालिकेनेही २०१७ पर्यंतच्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्यावे, अशी मागणी केली. अनेक झोपड्या २००० पूर्वीच्या आहेत. पण मूळ मालकाने झोपडी विकली आहे. मग ज्याने झोपडी विकत घेतली त्यांना पाणी देणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्याने नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. अपर्णा गवते, शुभांगीताई पाटील, शशिकला पाटील, रंगनाथ औटी, शंकर मोरे, बहादूर बिस्ट यांच्यासह अनेक नगरसेवकांनी गावठाण, माथाडी वसाहत, झोपडपट्टी परिसरातील पाणी समस्येवर लक्ष वेधले. मोरबे धरणाचे पाणी दिघापर्यंत का जात नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, झोपडपट्टीमधील नागरिकांना नळजोडणी आहे. यापूर्वी नळजोडणी घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट होती. आता फक्त दोन पुरावे असले की तत्काळ नळजोडणी देण्यात येणार आहे. २००० नंतरच्या नागरिकांसाठी ठाण्याच्या धर्तीवर अभय योजना सुरू करता येईल का याचीही माहिती घेतली जाईल, असे स्पष्ट केले. बहुमताने ठराव मंजूर झाला असला तरी शिवसेनेने सर्वांना पाणी देण्याचा आग्रह कायम ठेवला.