शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतही मुलींची बाजी

By admin | Updated: May 26, 2016 02:56 IST

बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

नवी मुंबई : बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३८२ मुले व ५६९१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. २५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्केहून अधिक तर तीन महाविद्यालयांचा १०० टक्के लागला आहे.राज्यातील विद्यार्थ्यांसह पालकांचे डोळे लागून राहिलेला बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. तूर्तास आॅनलाइनवर विद्यार्थ्यांना हा निकाल उपलब्ध करुन देण्यात आला असून छापील गुणपत्रक ३ जूनला दिले जाणार आहे. नवी मुंबईतून फ्रेश व रिपीटर अशा तब्बल १४ हजार १७८ विद्यार्थ्यांनी विविध शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७८५९ मुले तर ६३१९ मुलींचा समावेश होता. त्यांच्यापैकी ६३८२ मुलांनी व ५६९१ मुलींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.६६ टक्केने राज्याचा निकाल घसरला आहे. त्यामध्ये सर्वाधिक घसरण कला शाखेतल्या निकालाची झाली आहे. असे असले तरीही उत्तीर्ण होण्यामध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही राज्यासह नवी मुंबईतही मुलींनी बाजी मारली आहे.मागील काही वर्षांत नवी मुंबई देखील विद्यानगरी म्हणून ओळखली जावू लागली आहे. नवी मुंबई परिसरात महाविद्यालयांचे जाळे पसरले असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शैक्षणिक संस्था व त्यामधील शिक्षक हे देखील प्रयत्न करत असतात. अशा २५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्केहून अधिक लागलेला आहे, तर तीन महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागात ५१८ मुख्य व २५ उपकेंद्रांवर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेदरम्यान २१ विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याचे मुंबई विभागीय अध्यक्ष डी. जगताप यांनी सांगितले.