शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

घणसोली आगारात बसला आग

By admin | Updated: May 29, 2016 03:10 IST

एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही

नवी मुंबई : एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही सुरू झालेला नाही. त्यापूर्वीच बसची बॅटरी चार्जिंग होत असताना हा अपघात घडला आहे.केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात २० नव्या मिडी बस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस परिवहनला या बस मिळालेल्या असून त्यापैकी काही बस तीन दिवसांपासून वापरात काढलेल्या आहेत. तर आगार अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने उर्वरित बस आगारात उभ्याच आहेत. लवकरच त्या बस देखील शहरातल्या विविध मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. त्यापूर्वीच एका बसला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. एका रांगेत सर्व बस उभ्या असताना एका (एमएच ४३ एच ५४२३) बसने पेट घेतला. घटनेवेळी या बसची बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन या आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगीमध्ये बसचे इंजन पेटल्यामुळे बसचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला आहे. ही आग पसरून लगतच उभ्या असलेल्या इतर बस देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आगारातील कर्मचारी व अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली.सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक घनशाम मढवी यांनी आगारात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. परिवहनच्या ताफ्यात नव्यानेच दाखल झालेल्या बसने पेट घेणे ही धोक्याची सूचना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरात असताना आग लागली असती तर गंभीर दुर्घटना घडली असती. त्यामुळे नवीन आलेल्या सर्वच मिडी बसची तांत्रिक तपासणी करूनच त्यांच्या वापराबाबत निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)