शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे घणसोलीकरांचे लक्ष

By admin | Updated: February 16, 2017 02:19 IST

हस्तांतराच्या प्रक्रियेनंतर घणसोलीकरांचे महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. नोडमधील सिडकोच्या प्रलंबित कामांमुळे

नवी मुंबई : हस्तांतराच्या प्रक्रियेनंतर घणसोलीकरांचे महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. नोडमधील सिडकोच्या प्रलंबित कामांमुळे हस्तांतराला काहींचा विरोध असतानाही हे हस्तांतरण झाले आहे. यावेळी इतर नोडच्या तुलनेत घणसोलीच्या विकासावर अधिकाधिक भर दिला जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते.अनेक वर्षांपासून घणसोलीकरांना प्रतीक्षा असलेली नोडच्या हस्तांतराची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण झालेली आहे. या हस्तांतरानंतर होणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे घणसोलीकरांचे लक्ष लागले आहे. सुविधांच्या माध्यमातून नेमकं काय पदरात पडतंय याची उत्सुकता त्यांच्यात आहे. सिडकोसोबत झालेल्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर घणसोलीत झालेल्या वॉक विथ कमिशनर उपक्रमावेळी आयुक्तांनी घणसोलीच्या विकासात कसलीही काटकसर केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. नोडच्या विकासाकडे सिडकोकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घणसोली सेक्टर विभागातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत होत्या. इमारती उभारण्यासाठी भूखंड विकले, परंतु त्याठिकाणी रस्ते, मलनि:सारण वाहिन्या अशा मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नव्हत्या. अशातच हा नोड सिडकोकडे असल्याच्या कारणावरुन पालिकेकडूनही पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये हात आखडता घेतला जात होता. यामुळे लवकरात लवकर हा विभाग पालिकेच्या ताब्यात घेतला जावा अशी रहिवाशांची मागणी होती. परंतु आहे त्या स्थितीत नोडचे पालिकेला हस्तांतरण झाल्यास पालिकेवर आर्थिक भार पडणार असल्यामुळे काहींनी विरोध देखील केला होता. अशातच सिडकोने देखील सुविधांवर खर्चासाठी नाममात्र रक्कम देत पालिकेची बोळवण केलेली आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे घणसोलीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. उद्याने, खेळाची मैदाने यासाठी नोडमध्ये भूखंड राखीव असुन हे भूखंड पालिकेच्या ताब्यात आहेत. आरक्षणाप्रमाणे या भूखंडांचा विकास व्हावा, अशी त्यांची मूलभूत मागणी आहे. (प्रतिनिधी)