शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेतील भोजनपुरवठा वादग्रस्त

By admin | Updated: April 21, 2017 00:27 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमधील भोजन पुरवठा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भोजनावळीसाठी अधिनियमात काहीही तरतूद नाही

नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमधील भोजन पुरवठा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भोजनावळीसाठी अधिनियमात काहीही तरतूद नाही. प्रत्येक सभेला जेवण देणारी नवी मुंबई एकमेव पालिका असून ठेकेदार निकृष्ट जेवण देत असल्याने नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये दुपारी नगरसेवक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अधिकारी यांच्यासाठी १९९७ पासून जेवण पुरविण्यात येते. ही भोजनावळ दोन वर्षांपासून सातत्याने वादग्रस्त ठरू लागली आहे. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, राष्ट्रवादीच्या सपना गावडे व इतर अनेक नगरसेवकांनी ठेकेदार निकृष्ट पद्धतीचे जेवण देत असल्याचा आक्षेप सभागृहात घेतला होता. याशिवाय नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांच्याशिवाय अनेकजण घुसखोरी करून या अन्नदानाचा लाभ घेवू लागले होते. ही भोजनावळ कोणत्या नियमाप्रमाणे सुरू आहे याविषयी शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांनी लेखी प्रश्न विचारला होता. जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. ठेकेदाराला समज दिली आहे का याविषयीही विचारणा केली होती. याविषयी माहिती देताना प्रशासनाने भोजन पुरवठ्यासाठी अधिनियमात कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीवरून सचिवांनी वारंवार ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. पुरविण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसल्याबद्दल भोजनावळ बंद होण्याची शक्यता आहे. पालिकेने लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, धुळे, पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई, नाशिक, अहमदनगर, मीरा भार्इंदर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर व पुणे महापालिकेमध्ये प्रत्येक सभेच्यावेळी जेवण दिले जात नसल्याचेही स्पष्ट केले असल्याने आता याविषयी प्रशासन नक्की कोण भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.