शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवरून गाजली सभा

By admin | Updated: September 15, 2016 02:33 IST

पनवेल महानगर पालिकेबाबतच्या प्रश्नावर रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी चांगलीच गाजली. भाजपाने महानगरपालिका होण्यासाठी

अलिबाग : पनवेल महानगर पालिकेबाबतच्या प्रश्नावर रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी चांगलीच गाजली. भाजपाने महानगरपालिका होण्यासाठी तर, शेकापच्या काही सदस्यांनी त्याला विरोध असल्याचा सूर आळवला. महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावालाही सरकारने महत्त्व द्यावे, यासाठी प्रशासनाने सरकारकडे पत्रव्यवहार करावा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी प्रशासनाला दिले.उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी महत्त्वाचा पत्रव्यवहार वाचण्यास सुरुवात केली. त्यातील पहिलेच पत्र पनवेल महानगरपालिकेच्याबाबत होते. उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी तातडीने पनवेल महानगरपालिकेला विरोध दर्शविला. त्यानंतर राजेंद्र पाचील यांनी आक्षेप घेतला. पनवेल महानगरपालिकेमुळे ग्रामीण भाग विकासाच्या मुख्यप्रवाहात येणार आहे. महानगरपालिका निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढणार असल्याचे बोलत आहे. पनवेल येथील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा चांगला विकास होण्यावर भर देण्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले.सरकारचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ग्रामसभा ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन सरकार टाईमपास करीत असल्याचा आरोप शेकापचे सदस्य आस्वाद पाटील यांनी केला. ग्रामपंचायती या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ठरावही घेतला पाहिजे. यासाठी प्रशासनाने सरकारकडे पत्रव्यवहार करावा, अशी सूचना पाटील यांनी मांडली. प्रशासनाने तातडीने याबाबत सरकारकडे पत्रव्यवहार करावा असे आदेश अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिले.विशिष्ट हेतूने त्या-त्या दिवसाला पुरस्कार देण्याचे सरकारने नियोजन केले आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार त्याच दिवशी देणे गरजेचे होते, असे मत शिवसेनेचे सदस्य राजीव साबळे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवामुळे पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे अध्यक्ष टोकरे यांनी सांगितले.याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रकाश खोपकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, लेखा व वित्त अधिकारी अविनाश सोळंके यांच्यासह विविध पक्षाचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)